Side Effects Of Eating Fish During Monsoon: मासे खाण्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. मासे हे जगातील सर्वात पौष्टिक अन्न म्हणून गणले जाते कारण माशांमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यांचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. असे असूनही, तुम्हाला माहिती आहे का की पावसाळ्यात मासे खाणे फायदेशीर नसून तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. खरे तर पावसाळ्यात नद्या, तलाव आणि समुद्राचे पाणी अधिक घाण होते आणि त्यात विविध प्रकारचे जीवाणू आणि विषाणू वाढू लागतात. अशा परिस्थितीत घाणेरडया पाण्यात वाढलेले मासे खाऊन तुम्ही आजारी पडू शकता. तर पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला का दिला जातो ते जाणून घेऊया.
अन्नाची ऍलर्जी
पावसाळ्यात घशातील संसर्ग आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या अनेकदा अन्नाच्या ऍलर्जीमुळे होतात. याचे मुख्य कारण म्हणजे माशांच्या शरीरात अंडी आणि कोलेस्टेरॉलचे जास्त प्रमाण हे जळजळ होण्याचे मुख्य कारण बनू शकते.
पचनसंस्था कमजोर
पावसाळ्यात माणसाची पचनसंस्था कमकुवत होते. यामुळेच या ऋतूत मांसाहारासारख्या जड पदार्थ खाण्यास मनाई आहे. या प्रकारचा आहार पचनसंस्थेला पचणे कठीण होऊन जाते, ज्यामुळे काही वेळा पोटाचा त्रास होऊ शकतो.
( हे ही वाचा: Monkeypox: मंकीपॉक्स अभ्यासात आढळून आली तीन नवीन गंभीर लक्षणे; वेळीच जाणून घ्या)
अन्न विषबाधा
पावसाळ्यात तलाव आणि नद्यांच्या पाण्यात अनेक हानिकारक विषाणू आणि जीवाणू वाढतात, त्यामुळे माशांना संसर्ग होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही संक्रमित मासे खाल्ले तर तुम्हाला कॉलरा, डायरिया, कावीळ इत्यादींचा धोका असतो.कधीकधी घाणेरड्या पाण्यातील माशांमुळेही तुम्हाला टायफॉइड होऊ शकतो.
माशांची अंडी धोकादायक असू शकतात
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात माशांमध्ये अंडी घालण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही मासे त्याच्या अंड्यांसोबत खाल्ले तर पोटाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.ज्यामुळे व्यक्तीला अन्नातून विषबाधा होऊ शकते.
( हे ही वाचा: घरात माशांचा वावर वाढलाय? तर हे घरगुती उपाय आराम देतील)
शिळे मासे खराब होऊ शकतात
पावसाळ्यात नद्या, तलाव आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे काही किनारी भागात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात बाजारपेठेतील मासळीची मागणी पूर्ण करण्यासाठी ते आधीच शीतगृहात ठेवले जातात. हे मासे जास्त काळ ठेवल्यास खराब होऊ शकतात. शिवाय, साठवलेल्या माशांमध्ये, ताज्या माशांच्या तुलनेत पोषक तत्वे देखील खूप कमी असतात.
दूषित पाणी
मासे विविध प्रकारचे कीटक माइट्स आणि तत्सम जीवाणूंची शिकार करतात आणि त्यांचे सेवन करतात. हे जीवाणू इतके धोकादायक असतात की ते माशांच्या शरीरात विषारी पदार्थही सोडतात. हे पदार्थ त्यांच्या शरीरात बराच काळ टिकून राहतात आणि जेव्हा ते सेवन केले जाते तेव्हा ऊतकांच्या आत असलेले हे विषारी पदार्थ तुमच्या शरीरात सहज प्रवेश करतात.