हिवाळा आपल्या केसांची चमक घालवतो. केस अतिशय लवकर निस्तेज आणि कोरडे होऊ लागतात. त्यामुळे अशा दिवसांत आपण आपल्या केसांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते. नाही तर कोंडा होणे, केस तुटणे किंवा केसांना सांभाळणे मुश्कील होते. परंतु, असे का होते? याचे उत्तर मुंबईमधील त्वचा तज्ज्ञ आणि अँब्रोसिया अॅस्थेटिक्सची [Ambrosia Aesthetics] संस्थापिका डॉक्टर निकेता सोनावणे [Niketa Sonavane] यांनी इंडिया टुडे डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार “हिवाळ्यातील थंड हवेमध्ये आर्द्रता नसते, ओलावा नसतो. त्यामुळे आपोआप अशा वातावरणात केस जलद गतीने कोरडे होतात आणि ते जास्त प्रमाणात तुटण्याची शक्यता असते.”

“त्यासोबतच आपले केस एकमेकांवर घासले जाऊन, त्यांच्यात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. त्यामुळे केस फ्रिझी [कोरडे होऊन फुगणे] होऊन त्यांना सांभाळणे अवघड होते,” असेदेखील निकेता म्हणतात. हवेतील आर्द्रता कमी असल्याने, तुमच्या केसांच्या मुळाशी असलेली त्वचासुद्धा कोरडी होते. म्हणून या वातावरणामध्ये कोंड्यासारख्या समस्या अधिक प्रमाणात उदभवतात. परंतु, या सर्व गोष्टी टाळायच्या असल्यास काय करायचे? तर आपल्या केसांची काळजी घेताना या लहान लहान चुकांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

हेही वाचा : घरामध्ये हेअर स्पा करणे होईल शक्य; चमकदार केसांसाठी ‘या’ सोप्या आणि घरगुती स्टेप्सकडे द्या लक्ष

हिवाळ्यात केसांची निगा राखताना कोणत्या गोष्टीत कराव्यात आणि करू नयेत?

या चुका टाळा

१. गरम पाण्याने अंघोळ

थंड हवेमध्ये गरम पाण्याने अंघोळ करणे अनेकांना आवडते; परंतु असे न करता त्याऐवजी कोमट गरम पाण्याचा वापर करा. पाणी जास्त गरम असेल, तर तुमच्या त्वचेवरील आणि केसांमध्ये नैसर्गिकरीत्या असणारे तेल निघून जाते. परिणामी त्वचा आणि केस कोरडे पडू शकतात.

२. केसांवर गरम उपकरणांचा वापर

केसांना सरळ किंवा कुरळे करण्यासाठी आपण स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्न [केसांना आकार देणारी उपकरणे] वापरतो. परंतु, त्यांच्या अतिउष्ण तापमानामुळे केस कोरडे होऊन तुटू शकतात, असे निकेता म्हणतात. त्यामुळे शक्य असल्यास अशा उपकरणांचा वापर टाळावा अथवा कमी प्रमाणात करावा.

३. सतत केस धुणे

केसांची काळजी घेण्यासाठी जर तुम्ही त्यांना वरचेवर धुत असाल, तर तसे करू नका. अतिकेस धुण्यानेदेखील केसांमध्ये असणारे नैसर्गिक तेल आणि ओलावा निघून जाऊन, ते कोरडे होऊ शकतात.

हेही वाचा : केसांना घनदाट व चमकदार ठेवेल घरातील ‘हा’ एक पदार्थ; पाहा या सहा पद्धती

हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काय करावे?

१. केसांना हायड्रेटेड ठेवणे

हिवाळ्यामध्ये हवा कोरडी असते. त्यामुळे आपले केस शुष्क होतात. असे न होण्यासाठी ग्लिसरिन, ह्यालुरोनिक ऍसिड [glycerine, hyaluronic] असणारे आणि केसांना मॉइश्चराइझ्ड करणारे असे शाम्पू अन् कंडिशनर वापरा, असा सल्ला डॉक्टर निकेता यांनी दिला आहे.

२. कंडिशनिंग

थंड हवेमुळे केसांची मुळे आणि त्वचा कोरडी होते; ज्यामुळे कोंड्याचा त्रास होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी खोलवर पोषण करणाऱ्या हेअर मास्कचा वापर करावा. तुमच्या केसांना अधिक जास्त पोषण मिळावे यासाठी आठवड्यातून दोनदा या हेअर मास्कचा वापर करावा, असे डॉक्टर निकेता म्हणतात.

३. केस झाकणे

बाहेर जाणार असल्यास हिवाळ्यासाठी योग्य असेल अशी टोपी किंवा स्कार्फमध्ये आपले केस झाकून घ्या. त्यामुळे केस वाऱ्यावर जास्त उडणार नाहीत आणि त्यांना सांभाळणे सोपे होईल.

या सगळ्यांसोबत तुम्ही कोणते उत्पादन वापरत आहेत हेदेखील महत्त्वाचे असते. त्यामुळे हिवाळ्यात कोणत्या गोष्टींचा वापर केसांसाठी करावा आणि करू नये ते पाहा.

कोणत्या गोष्टी केसांसाठी वापराव्यात?

केसांवर लावण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये कोणते घटक आहेत ते पाहा. जर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनामध्ये ग्लिसरिन, ह्यालुरोनिक अॅसिड, अर्गन तेल असे घटक असल्यास ते तुमच्या कोरड्या केसांना चांगले पोषण देऊ शकते. त्यामुळे त्यांचा वापर करावा. तुमचे केस तेलकट असल्यास कोरफड असणाऱ्या उत्पादनांचा वापर करावा.

कोंडा किंवा केसांच्या मुळाशी त्वचा कोरडी पडत असल्यास, तुम्ही बाजारात कोंडा घालवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांचा वापर करू शकता. त्याव्यतिरिक्त जर केसांच्या मुळाशी असलेली मृत त्वचा काढून टाकायची असेल, तर एखाद्या कंगव्याचा किंवा ब्रशचा वापर करू शकता.

हेही वाचा : फेसपॅक लावताना तुमच्याकडूनही होतात का ‘या’ पाच चुका? त्वचेच्या काळजीसाठी लक्ष द्या या गोष्टींकडे….

कोणत्या गोष्टी वापरू नयेत?

ज्या उत्पादनांमध्ये अल्कोहोलचा वापर केला गेला असेल किंवा ज्यामध्ये सल्फेट हा घटक असेल, तर अशी उत्पादने केसांसाठी न वापरण्याचा सल्ला डॉक्टर निकेता यांनी दिला आहे. “अशा उत्पादनांमुळे आपल्या त्वचेला आणि केसांना त्रास होऊ शकतो. आपल्या केसांमधील ओलावा व नैसर्गिक तेल अशा उत्पादनांमुळे निघून जाते आणि आपले केस कोरडे आणि निस्तेज होतात.”

Story img Loader