पावसाळ्यात अनेक संसर्ग पसरतात. त्यामुळे या ऋतूत आजारी पडणाऱ्यांची संख्या ही जास्त असते. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत असते त्यामुळे रोगांचे प्रसार हे झपाटयाने होतात. तसंच कोरोनाचा प्रादुर्भावही अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात व्हायरल ताप हा बहुतांश लोकांना येतो. व्हायरल इन्फेक्शन्सची सुरुवात मुख्यतः घसा खवखवण्या पासून होते. यासोबतच नाक वाहणे, ताप, खोकला अशी लक्षणेही दिसून येतात. संसर्गाची सुरुवातीची लक्षणे दिसताच तुम्ही सावध राहिल्यास लवकर बरे होऊ शकतात. व्हायरल ताप आला की तुम्ही लगेच औषधे घेण्यास सुरुवात करतात. मात्र, असे न करता सुरुवातीच्या काळात असे काही सोपे मार्ग अवलंबून पहा, ज्याने तुम्ही लवकर बरे व्हाल. तर जाणून घ्या व्हायरल तापाची सुरुवातीची लक्षण दिसताच कोणती काळजी घ्यावी.
सुरुवातीची लक्षणं दिसताच हे उपाय करा
व्हायरल तापाचा हा विषाणू मुख्यतः नाकातून शरीरावर हल्ला करतो. यानंतर ते घशात पोहोचतात आणि वरच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. शरीरात पोहोचून, ते स्वतःची संख्या वाढवतात आणि तुम्हाला आजारी बनवतात. जेव्हा तुम्हाला शिंक येईल, आळशीपणा जाणवेल किंवा थोडासा घसा खवखवल्यासारखे वाटत असल्यास, सर्वप्रथम, कोमट पाण्यात मीठ टाकून कुल्ला करा. जर तुमच्याकडे Betadine Gargle असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता. त्यानंतर वाफ घ्या. औषधांचा विषाणूवर परिणाम होत नाही, त्यामुळे अँटिबायोटिक्स वगैरे घेऊ नका.
( हे ही वाचा: Mansoon Tips: पावसाळ्यात ‘हे’ घरगुती उपाय सर्दी आणि ताप कमी करतील; रोगप्रतिकारक शक्ती देखील होईल मजबूत)
तापाचे औषध लगेच घेऊ नका
यूएस डॉक्टर एरिक बर्ग यांच्या मते, जर तुम्हाला ताप आला असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढत आहे. शरीर गरम केल्यावर विषाणू नष्ट होतात. तापमान वाढवून संसर्ग वाढण्यापासून रोखण्याचा हा शरीराचा मार्ग आहे. त्यामुळे, ताप कमी करण्यासाठी लगेच काउंटर औषध घेऊ नका. तापमानात ९९ फॅरेनहाइट वाढ होणे हा ताप मानला जात नाही. १०० पेक्षा जास्त तापमान ताप म्हणून गणला जातो. जर तुमचे तापमान १०० च्या वर जात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तापाचे औषध घ्या.
‘या’ सर्व गोष्टी खा
झिंक, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी व्हायरसला कमकुवत करतात. आपण मल्टीविटामिन घेऊ शकता. त्यांचे नैसर्गिक स्त्रोत घेणे चांगले होईल. त्यासाठी तुम्ही उन्हात बसू शकता, सुका मेवा खाऊ शकता आणि व्हिटॅमिन सी समृद्ध फळे खाऊ शकता. घसा दुखत असेल तर आंबट फळे, दही आणि सोडायुक्त पेये घेऊ नयेत. कोमट पाणी आणि मध घ्या. भरपूर पाणी प्या. हलका आहार घ्या आणि विश्रांती घ्या. तुम्ही ग्रीन टी देखील पिऊ शकता. मुळेथी हे नैसर्गिक विषाणूविरोधी मानले जाते. तुम्ही चहा, गरम पाणी किंवा ग्रीन टीमध्ये मुळेथी टाकून पिऊ शकता. अन्नामध्ये सूप, गरम पेय आणि अधिक प्रथिने घ्या. झोपताना हळद, काळी मिरी टाकून दूध घ्या आणि झोपण्यापूर्वी गार्गल करायला विसरू नका.