Home Remedies: अनेकदा लोक पायांना तीव्र खाज सुटते आणि जळजळ होते आणि वेळोवेळी खाज खूप तीव्र होते, ज्यामुळे खूप त्रास होतो. या समस्येमुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागते. वास्तविक, यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात, जसे की शरीरात पाण्याची कमतरता, पायांमध्ये रक्ताभिसरण वाढणे, काही प्रकारची ऍलर्जी किंवा मधुमेह इत्यादी. बर्‍याच वेळा ही समस्या अधूनमधून उद्भवते, परंतु जर पायांच्या तळव्यांची आग होत असेल किंवा तीव्र खाज सुटत असेल किंवा अवेळी उद्भवली असेल तर काय करावे हे समजत नाही अशावेळी काही सोपे उपाय करून तुम्ही पायात जळजळ होण्याची समस्या कमी करू शकता.

सैंधव मीठ
सैंधव मीठाचे पाणी तळपायांच्या होणाऱ्या आगीपासून आराम देण्यास मदत करते. हे रक्ताभिसरण सुधारते आणि जळजळ आणि वेदना कमी करते. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात. किचनमध्ये सैंधव मीठ सहज उपलब्ध आहे. या उपायाचा वापर करताच पहा तुमच्या पायाची आग नाहीशी होईल. सैंधव मीठ पाण्यात मिसळून प्यायल्याने तळव्यांची खाज आणि आग दोन्ही दूर होते.

Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Health Benefits of Castor Oil
रोज एक चमचा एरंडेल तेलाच्या सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…

दही
तळव्यांची आग कमी करण्यासाठी दही खूप प्रभावी आहे. वास्तविक, दह्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे पायाला होणार संसर्ग कमी होतो. तर दह्याचा कूलिंग इफेक्ट असतो. अशा परिस्थितीत, ते केवळ तुमच्या खाज येणाऱ्या तळव्यांना थंडवा देतो आणि त्यांना कोमल करण्यास मदत करतो. दही खाल्ल्याने तळव्यांना होणारी खाजही कमी होते.

हेही वाचा – रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणानंतर बीट का खाल्ले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

कोरफड
पायांना तीव्र खाज येत असेल तर कोरफडीचा गर पायांवर लावावा. यामुळे तुमच्या पायात थंडावा जाणवेल.

मॉइश्चरायझर
पायात तीव्र खाज येत असेल तर पाय चांगले धुवावेत. धुतल्यानंतर त्यावर थोडे मॉइश्चरायझर लावावे.

खोबरेल तेल
तुम्ही तुमच्या पायाला खोबरेल तेल देखील लावू शकता, ते लावल्याने तुम्हाला आराम मिळेल. पाय धुतल्यानंतरही खोबरेल तेल लावा.

हेही वाचा – तुमच्या महागड्या सिल्क साड्यांचा रंग जातोय? मग या सोप्या टिप्स वापरून पाहा, येईल नव्यासारखी चमक

ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर पायांची होणारी आग दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे संसर्ग कमी होते. हे तळव्यामध्ये रक्ताभिसरण देखील सुधारते.

बर्फाचे पाणी
तळव्यामध्ये जळजळ कमी करण्यासाठी बर्फाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. त्यात किमान १५ मिनिटे पाय ठेवा. तुम्हाला तात्काळ आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर बर्फाच्या पाण्यात पाय ठेवू नका. उन्हाळ्यात बर्फ घरी किंवा बाजारात सहज उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत, या चार उपायांचा अवलंब करून, तुम्ही काही मिनिटांत तुमच्या तळव्यातील आग दूर करू शकता.