Shani Remedies in Marathi : ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायाचे दैवत शनिदेव चांगली कर्म करणाऱ्यांना शुभ फल प्रदान करतात, तसंच वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षाही देतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं. असं मानलं जातं की शनीची साडेसाती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीनदा येते. ज्यामध्ये साडीसाती ही साडे सात वर्षांची असते. यात अडीच-अडीच वर्षांच्या तीन ढैय्या असतात.
मकर, कुंभ आणि धनु राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची साडेसाती सुरू आहे. तसंच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर ढैय्याचा प्रभाव पडतो आहे. साडेसाती आणि ढैय्याचे नाव ऐकून माणूस घाबरून जातो, पण असं नाही, काही ज्योतिषीय उपाय केल्यास शनिदेवाचा प्रकोप बर्याच प्रमाणात टाळता येईल.
शनी ग्रहासाठी काही उपाय :
लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा आणि शनी ग्रहाचे उपाय हे सूर्यास्तानंतरच करावेत, असा सल्लाही ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिला आहे कारण शनिदेवाची वेळ सूर्यास्तानंतरच सुरू होते.
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास शनिदेव ॐ शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा.
आणखी वाचा : Shani Transit 2022 : ३० वर्षांनंतर शनीचा होणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांचं नशीब उजळणार
एक वाटी मोहरीचे तेल घ्या. या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवे असल्यास या तेलाचा दिवा लावून शनिदेवाच्या मंदिरात ठेवू शकता. असे केल्याने आरोग्यासही फायदे होतील.
आणखी वाचा : Merry Christmas 2021 : ‘ख्रिसमस ट्री’ची सजावट करायचीय? मग या चार सोप्या डेकोरेशन आयडियाज एकदा नक्की वापरा
शनिवारचा दिवस गेल्यानंतर कुष्ठरोग्यांना काळ्या रंगाचे पेय द्यावे. शक्य असल्यास त्यांना काळे वस्त्रही दान करावे. विशेषतः हिवाळ्यात काळ्या रंगाचे उबदार कपडे दान करणे उत्तम मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
आणखी वाचा : ‘या’ ४ राशींची मुले चांगले पती सिद्ध होतात, पत्नीला फुलासारखं जपतात
सात प्रकारचे धान्य घ्या. हे दाणे डोक्यावरून सात वेळा फिरवा. मग हे धान्य चौकाचौकात राहणाऱ्या पक्ष्यांसाठी दान करा. शक्य असल्यास हा उपाय रोज करा अन्यथा शनिवारी हा उपाय करा.