Viral Video : अनेकदा सकाळी झोपेतून उठल्यावर अंग धरुन येते किंवा शरीर जड वाटते किंवा अंग आखडून जाते. अशावेळी फक्त आळस येतो. तुमच्याबरोबर असे कधी होते का? जर हो, तर मग सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी तुम्ही हे पाच योगा स्ट्रेचेस तुम्ही करायला पाहिजे. सोशल मीडियावर योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सकाळी उठल्यानंतर करता येईल असे पाच योगा स्ट्रेचेस सांगितले आहेत. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर करा हे पाच योगा स्ट्रेचेस
व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
योग अभ्यासक मृणालिनी यांनी ५ योगा स्ट्रेचेस सांगितले आहेत.
- सुप्त उत्थित ताडासन हे ३० सेकंद करा.
- अर्धपवनमुक्तासन हे ३ ते ५ वेळा करा.
- मर्कटासन सुद्धा ३ ते ५ वेळा करा.
- मार्जरीआसन ३ ते ५ वेळा करा.
- शशांकासन ३० सेकंद करा.
मृणालिनी यांनी हे पाच ही योगा स्ट्रेचेस करून दाखवले आहे.तसेच त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे की उठल्या उठल्या हे पाच योगा स्ट्रेचेस करायला विसरू नका.
हेही वाचा : पावसाच्या पाण्याने घरातील भिंती ओलसर झाल्यात, त्यात पाणी झिरपतय? मग करा ‘हे’ सोपे उपाय; त्रास होईल दूर
पाहा व्हायरल व्हिडीओ
yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बऱ्याच जणांना झोपेतून उठल्यावर अंग आखडणे, मान पाठ दुखणे यासारखी समस्या जाणवते अश्या वेळी योगामधले स्ट्रेचेस उपयोगात येतात.व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे पाचही योगासनांचा सराव तुम्ही सकाळी उठल्या उठल्या केल्यास अंग धरून येण्यासारखी समस्या नक्कीच कमी होईल. याचबरोबर झोपण्याची जागा, अंथरून आरामादायी असावे व डोक्याखाली सपाट व मऊ उशी वापरावी.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”धन्यवाद ताई तुझे योगा व्हिडीओ बघून खूप आरोग्याचे फायदे मिळाले.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान, तुमच्या टिप्स खूप उपयुक्त असतात….” आणखी एका युजरने लिहिलेय, “छान माहिती दिली” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला.
मृणालिनी या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवनवीन योगाअभ्यासाविषयी सांगतात. त्यांचा प्रत्येक व्हिडीओ युजर्सना आवडतो. युजर्स त्यांच्या व्हिडीओवर भरभरून प्रतिसाद देतात.