Healthy Lifestyle : चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहाराबरोबरच व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. अशात सकाळचा व्यायाम हा अधिक फायदेशीर मानला जातो. मॉर्निंग वॉक हा चांगल्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. मॉर्निंग वॉकहून आल्यानंतर तुम्ही काही चुका करता का? कारण- अनेक जण मॉर्निंग वॉकला जातात; पण त्यांना हवा तसा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. मॉर्निंग वॉकहून परत आल्यानंतर कोणती तीन कामं करावीत? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भरपूर पाणी प्यावे

जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकहून परत येता, तेव्हा एका तासापर्यंत भरपूर पाणी प्यावं. सकाळी फिरल्यानंतर आपलं शरीर खूप थकतं. अशा वेळी शरीराला पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे मॉर्निंग वॉकहून परत येताच भरपूर पाणी प्यावं. त्यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा नियंत्रणात राहील आणि शरीर हायड्रेटेड असेल.

हेही वाचा : ‘या’ वयात करा लग्न; दीर्घकाळ टिकेल नातं; वाचा संशोधन काय सांगते …

शरीराचे तापमान थंड करा

मॉर्निंग वॉकदरम्यान शरीराचं तापमान वाढतं; ज्यामुळे परतल्यानंतर खूप घाम येतो. अशा वेळी मॉर्निंग वॉकहून परत आल्यानंतर शरीराचं तापमान थंड करावं. एका शांत ठिकाणी बसावं; ज्यामुळे हार्ट बीट्स सामान्य होतील आणि शरीरातील थकवा नाहीसा होईल.

प्रोटीनचे सेवन करा

सकाळी फिरण्याचे अनेक चांगले फायदे आहेत; पण सकाळी फिरल्यानंतर अनेकदा शरीराला पाणी आणि प्रोटीनची आवश्यकता भासते. प्रोटीनमुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकहून परतल्यानंतर प्रोटीनचे सेवन करावे.