Belly Fat Yoga: आजकाल तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी पोटाची चरबी वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. वाढलेले पोट तुमचे आरोग्य बिघडवतेच; पण अनेक प्रकारचे आजार होण्याचाही धोका असतो. अशा वेळी अनेक जण डाएटपासून जिम एक्सरसाइजपर्यंत अनेक प्रयत्न करतात. परंतु, सगळ्यांकडेच तेवढा वेळ नसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक खास आणि सोपा व्यायाम सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोटावर चरबी का जमा होते?

पोटावर चरबी जमा होण्याचे मुख्य कारण म्हणजे खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव. तसेच आजच्या काळात वाढता ताणतणाव आणि अस्वस्थ जीवनशैली आहे. त्याव्यतिरिक्त बरेच लोक जास्त जंक फूड खातात, ज्यामुळे त्यांच्या पोटावर चरबी जमा होऊ लागते. तथापि, पोटाची चरबी जमा होणे हे ताणतणाव आणि कमी झोपेमुळे होऊ शकते.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही प्लँक व्यायाम करू शकता. हा तुमच्या कोअर स्नायूंना बळकटी देतो आणि पोटाचे स्नायू घट्ट करतो. या व्यायामामुळे चयापचय वाढून, चरबी जलद गतीने कमी होते. प्लँक योग्यरीत्या केल्याने पाठीचा कणा आणि पोटाजवळील स्नायू मजबूत होतात.

प्लँक व्यायाम कसा करावा?

प्लँक व्यायाम करण्यासाठी प्रथम सपाट पृष्ठभागावर योगा मॅट पसरवा. आता पोटावर झोपा. त्यानंतर तुमचे कोपर तुमच्या खांद्याच्या अगदी खाली ठेवा. आता तुमचे शरीर जमिनीपासून वर उचला आणि तुमच्या कोपरांवर आणि पायांच्या बोटांवर शरीर संतुलित करा. यादरम्यान, तुमच्या पोटाचे स्नायू घट्ट ठेवा आणि श्वास घेत राहा. सुरुवातीला तुम्ही या स्थितीत २० ते ३० सेकंदांपर्यंत राहू शकता. त्यानंतर तुम्ही ही वेळ हळूहळू एक ते दोन मिनिटांपर्यंत वाढवा.

या गोष्टी टाळा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त या एकाच व्यायामाच्या प्लँकवर अवलंबून राहू नका. त्याशिवाय तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देऊ शकता आणि जंक फूडपासून दूर राहू शकता. तुमच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करा आणि साखर व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. पोटाची चरबी टाळण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैलीदेखील बदलू शकता.