सौंदर्याची परिभाषा काय ? नैसर्गिक असेल तर उत्तमच, पण ते फार कमी लोकांना मिळते. हे नैसर्गिक रुप प्रत्येकाला मिळाले नाही तरी, जे मिळाले उत्तमप्रकारे खुलवता येऊ शकते. त्याकरीता यंदाच्या दिवाळीत चेहऱ्यावर खूप साऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा मारा न करता अगदी थोडक्यात त्यांचा वापर करुन ते खुलवता येतेय. त्यासाठी या छोट्याछोट्या टिप्सचा वापर करुन तुम्ही झटपट मेकअप नक्कीच करु शकता. यासाठी या टिप्स वापरा आणि दिसा सुपर स्टायलिश आणि आकर्षक.
असा करा झटपट मेकअप
मॉईस्चराईजर लावा
त्वरीत उजळपणा येण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर सर्वात पहिले मॉईस्चराईजर लावा. त्यानंतर तुमच्या स्किन टोनला मॅच असणारे फाऊंडेशन लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर त्वरीत उजळपणा दिसून येईल. फाऊंडेशन लावायला वेळ नसेल तर चेहऱ्याला प्राईमर लावायला मात्र विसरू नका.
काजळ लावा
तुम्ही डोळ्यांचा भाग जास्त हायलाईट करणं गरजेचे आहे. तुम्ही डोळ्यांना पटकन स्मोकी आय लुक देऊ शकता अथवा डोळ्यांना थोडं जाडे आयलायनर लाऊन काजळ लावा.
आणखी वाचा : दिवाळीत वजनाची चिंता करु नका; फराळ बनवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, वजन येईल नियंत्रणात
लिपस्टिक लावा
ओठांना गडद रंगांची लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावल्याने तुमचा मेकअप पूर्ण होईल.
ब्लश लावा
तुमच्या गालावर थोड्या प्रमाणात लिपस्टिक लावा आणि ते चांगले ब्लेंड करा. यासाठी तुम्हाला जास्त लिपस्टिक वापरण्याची गरज नाही.
मस्कारा
मस्कारा देखील तुम्ही इंस्टंट लावू शकता. यामुळे तुमच्या पापण्या जाड दिसतील. यामुळे तुमचे डोळे खूप सुंदर दिसतील. याने तुमचा मेकअप पूर्ण होतो.
तसेच, रोजच्या मेकअपसाठी तुम्ही संपूर्ण मेकअप करायची अजिबात गरज नाही. डोळ्यांना काजळ आणि लायनर लावा. फाऊंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावा. ओठांवर लिप ग्लॉस लावा आणि तुम्ही व्हाल पटकन तयार. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पाच मिनिट्सपेक्षा जास्त वेळ लागणार नाही.