आपला आहार आणि पोटाचे आरोग्य या दोन गोष्टींवर आपल्या शरीराचे एकंदर आरोग्य ठरत असते. या दोन्ही गोष्टींपैकी एकात जरी बिघाड झाला तरी त्याचा विपरीत परिणाम, जसे कि अन्नपदार्थांचे पचन व्यवस्थित न होणे, पदार्थांमधील पोषक घटक शरीरात शोषून घेण्यास अडथळा निर्माण होणे, चयापचय क्रिया यांसारख्या गोष्टींचा आपल्या शरीरावर होत असतो. परंतु अशा गोष्टी होऊ नये, पोटाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी केवळ एक योगासन तुमची नक्कीच मदत करू शकते, अशी माहिती सेलिब्रेटी योगा प्रशिक्षक अनुष्का परवानीने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून शेअर केलेल्या व्हिडिओमधून मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर, दररोज व्यायाम किंवा योगा करावा असे आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. यासोबत, जेवल्यानंतर व्यायाम करू नये हेसुद्धा सांगतिले जाते. मात्र अनुष्काच्या @anushkayoga या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तिने पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे वज्रासन हे योगा प्रकार जेवणानंतर करायला सांगितले आहे. वज्रासन करण्यास अतिशय सोपे व सुटसुटीत आसन आहे. असे, पोटासाठी फायदेशीर असणारे वज्रासन कसे करावे ते पाहा

हेही वाचा : हिवाळ्यात केसांना कोंड्यापासून ठेवा दूर! केसांची काळजी घेण्यासाठी पाहा ‘हे’ पाच सोपे घरगुती उपाय….

पोटाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वज्रासन कसे करावे पाहा

सर्वप्रथम दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून वज्रासनात बसावे.
नंतर उजव्या हाताचे पहिले बोट/तर्जनी [अंगठ्याच्या बाजूचे बोट] आणि मधले बोट अंगठ्याला लावून मुद्रा बनवावी.
डाव्या हाताचे मधले बोट आणि अनामिक [चौथे बोट] आपल्या अंगठ्याला लावून अजून एक मुद्रा बनवून घ्यावी.
आता हाताच्या मुद्रा आपल्या मांडीवर ठेवून, दीर्घ श्वासोत्श्वास करावे.
हे आसन जेवण झाल्यानंतर, १५ मिनिटांसाठी करा.
तुम्हाला वज्रासनात बसण्याची सवय नसल्यास सुरवातीला ४ ते ५ मिनिटांसाठी हे आसन, करून हळूहळू सराव करून १५ मिनिटांपर्यंत हे आसन करावे.

जेवणानंतर वज्रासन करण्याचे फायदे पाहा

  • जेवण झाल्यानंतर हे आसन केल्यानंतर, तुमची पचनशक्ती, चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते.
  • पित्ताचा त्रास होत नाही.
  • जेवण अधिक प्रमाण झाले असल्यास, अपचन होण्यापासून रोखते.
  • जठराचे आरोग्य सुधारते.
  • यासर्वांसोबत वज्रासनात बसल्याने, ओटीपोटाचे स्नायूदेखील मजबूत होण्यास मदत होते.

अनुष्काने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केलेल्या व्हिडीओला आजपर्यंत १ लाख ९२ हजार व्ह्यूज आणि ३ हजार लाईक्ससुद्धा मिळाले आहेत.