Should You Drink Water After Desserts : अनेक लोकांना गोड खाण्याची सवय असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक गोड खायला आवडणारे दिवसभरातून कित्येकदा गोड पदार्थ खातात. काही लोकांना गोड खाल्यानंतर लगेच पाणी प्यायची इच्छा होते.
काही लोक जेवणानंतर तर काही लोक नाश्त्यानंतर आवर्जून एक तुकडा गोड पदार्थ खातात आणि त्यानंतरच पाणी पितात. पण तुम्हाला माहितीये का गोड खाल्ल्यानंतर पाणी पिणे कितपत योग्य आहे? किंवा गोड खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (do we drink water after having desserts what happens when we drink water after having desserts)
गोड खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही?
इनशॉर्टने दिलेल्या माहितीनुसार, गोड खाल्यानंतर पाणी प्यायल्याने साखरेचा आतड्यांच्या आरोग्यावर कोणताही वाई परिणाम होत नाही. उलट डिहायड्रेशनशी संबंधित रक्तातील साखरेची मात्रा वाढण्यास थांबवते आणि पचनास मदत करते, असा दावा अनेक वैद्यकीय अभ्यासातून तसेच तज्ज्ञांनी केला. अभ्यासातून असे दिसून आले की हायड्रेशन एन्झाइम तयार करण्यास मदत करते आणि त्यामुळे अन्नाचे कण बाहेर काढून दात किडण्याचा धोका कमी होतो आणि एकंदरीत तोंडाचे आरोग्य निरोगी राहते.
रोज जेवल्यानंतर गोड पदार्थ खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?
जेवणानंतर गोड पदार्थ खाणे ही अनेकांच्या घरात सामान्य गोष्ट आहे. जेवणानंतर काहीतरी गोड खायला मिळाले म्हणजे जेवण पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. पण, रोज रात्री जेवल्यानंतर गोड खाण्याच्या या सवयीचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार कोणी करीत नाही.
मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले की, जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने इन्सुलिनचा प्रतिकार (Insulin Resistance) होऊ शकतो; ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. “शरीर अतिरिक्त साखरेचे फॅट्समध्ये रूपांतर करते आणि चयापचयावर परिणाम करणारी ही बाब लठ्ठपणाला कारणीभूत ठरते.”
नियमितपणे साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने ट्रायग्लिसराइडची पातळी (Triglyceride levels) वाढू शकते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्यादेखील वाढू शकतात. त्याशिवाय साखरेची पातळी सतत उच्च राहण्यामुळे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होऊ शकतो. अकाली वृद्धत्व येऊ शकते; जी बाब संभाव्यतः दीर्घकालीन आजारांना (Chronic diseases) होण्यास कारणीभूत ठरू शकते. या सवयीमुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे एकूणच आरोग्यावर परिणाम होतो.