Belly Fat Loss : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहाराची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हल्ली एक समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते ती म्हणजे वाढलेली पोटाची चरबी. तुमच्या आजुबाजूला असे अनेक लोक असतील जे या समस्येचा सामना करत आहे. अनेकदा खूप प्रयत्न करूनही पोटावरील चरबी कमी होत नाही पण टेन्शन घेऊ नका आज आपण पोटाची चरबी कशी कमी करायची त्याविषयी जाणून घेणार आहोत. सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक फक्त दिवसात पोटाची चरबी कशी कमी करायची, त्याविषयी सांगितले आहे.
या व्हिडीओमध्ये एक योग अभ्यासक १० दिवसात पोटाची चरबी कशी कमी करायची, याविषयी सांगताना दिसते. ती साधा सोपा एक योगा करण्यास सांगते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल योग अभ्यासक मंडूकासन करताना दिसत आहे. त्यासाठी त्या पाय दूमडून बसलेल्या दिसत आहे. त्यानंतर त्या दोन्ही हात पोटावर ठेवतात आणि पाठीपासून वाकून डोके जमीनीवर ठेवतात आणि उचलतात. असे त्या २० वेळा तीन सेट मध्ये करतात. हा सोपा व्यायाम केल्याने फक्त दहा दिवसात तुमची पोटाची चरबी कमी होईल.
yogsparsh_93 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोटाची चरबी वाढण्याची कारणे
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास पोटाचा आकार वाढत जातो.
अतिशय तेलकट, processed पदार्थ खाल्याने, जंक फुड खाल्याने पोटाचा घेर वाढतो.
खुप वेळ एका ठिकाणी बसून असल्यास पोटाची चरबी वाढते.
अतिशय निवांतपणा आल्यास पोट वाढते.
उपाय:
सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
रोज किमान चालणे गरजेचे आहे.
आहारामध्ये फळाचं प्रमाण वाढवा.
जेवणाची वेळ पाळणे.
तणाव हाताळणे”
हेही वाचा : खोकल्यावर औषधं घेऊनही आराम नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं हे संत्र्याचं सिरप बनवा घरच्या घरी
पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नक्की होईल का…मी प्रयत्न करते” तर एका युजरने लिहिलेय, “मी करेन पण खरंय उपयोग होईल ना” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर. धन्यवाद”