उन्हाळ्यात आंबा खाल्ला नाही असं फार क्वचितच घडतं. उन्हाळ्यात प्रत्येकजण रसाळ आंब्याचा आनंद लुटतात. उगाचच आंब्याला फळांचा राजा म्हणत नाहीत. पण, आंब्याबद्दल अनेकदा अनेक प्रकारचे अनुमान लावले जातात. जसे की, आंब्यांमुळे वजन वाढते का, ते खाल्ल्यावर पचनशक्ती चांगली आहे की नाही, आंबे कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी नाही, इत्यादी. पण, आंबा खाण्याची एक योग्य वेळ आहे. वेगवेगळ्या वेळी आंबे खाण्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. आज आपण जाणून घेऊया की रात्रीच्या जेवणानंतर आंबे खाणे चांगले की वाईट.
- कॅलरीज वाढतात :
सामान्य आकाराच्या आंब्यामध्ये सुमारे १५० कॅलरीज असतात. रात्री आंबा खाल्ल्यास तुमच्या कॅलरीजचे प्रमाण अनेक पटींनी वाढू शकते. त्यामुळेच रात्री उशिरा आंबा खाण्याऐवजी दिवसा खावा, असेही म्हटले जाते.
वयानुसार आहारात करा ‘हे’ बदल; जाणून घ्या कोणत्या वयात कोणते पदार्थ ठरतील उपयुक्त
- शरीराचे तापमान वाढवते :
जे रात्री आंबे खातात त्यांनी हेही लक्षात ठेवावे की आंबा शरीरातीळ तापमानही वाढवू शकतो. अनेक वेळा जास्त आंबे खाल्ल्यानंतर पिंपल्स येण्याची समस्या उद्भवते. ज्या लोकांच्या त्वचेवर आधीच मुरुमे आहेत त्यांनी आंबा खाताना विशेष काळजी घ्यावी.
- रक्तातील साखरेची पातळी वाढते :
ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी विशेषतः रात्री आंबा खाणे टाळावे. शरीरातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी आंबा कारणीभूत ठरू शकतो.
- वजन वाढू शकते :
वजन वाढवण्यातही आंबा उपयुक्त मानला जातो. दिवसा आंबा खाल्ल्याने व्यक्तीची शारीरिक हालचाल राहते त्यामुळे रात्रीच्या तुलनेत शरीरात कमी चरबी जमा होते. जर तुमचे वजन आधीच वाढलेले असेल तर रात्री आंबे खाल्ल्याने ते जास्त वजन वाढू शकते.
Health Tips : नोकरी करणाऱ्या महिलांनी ‘या’ गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या
- अपचनाची समस्या उद्भवू शकते
रात्री आंबा खाल्ल्यास अपचनाच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. हे आंबे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे होऊ शकते. म्हणूनच असं म्हटलं जातं की दुपारच्या जेवणात आंबा खाणे उत्तम ठरते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)