Which is the best time to exercise: निरोगी राहण्यासाठी अनेक जण जिममध्ये जातात किंवा योगा करतात. दररोज व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते. तसेच त्यामुळे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदेही होतात. खरं तर, सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे सर्वांत फायदेशीर मानले जाते. पण, हल्ली ऑफिसच्या विविध वेळांमुळे व्यायाम करण्यासाठी लोक विविध वेळ निवडतात आणि कोणत्याही वेळी जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीदेखील अशा व्यक्तींपैकी एक असाल, तर आम्ही तुम्हाला व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती हे सांगणार आहोत.
व्यायाम कोणत्या वेळी करू नये?
जेवल्यानंतर व्यायाम करणे टाळा
जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. जेवल्यानंतर वजन उचलल्याने पचनाच्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे पचनाचे विकार, तसेच पोटदुखी, उलट्या होऊ शकतात. जेवल्यानंतर शतपावली करणे हा नेहमीच चांगला पर्याय आहे.
दिखावा करण्यासाठी जास्त वजन उचलू नका
बऱ्याच वेळा लोक दिखावा करण्यासाठी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त वर्कआउट करतात आणि जास्त वजन उचलतात, ज्यामुळे त्यांना स्नायुदुखीसारख्या अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे व्यायाम करताना तुमची क्षमता लक्षात घ्या.
हेही वाचा: कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?
झोपण्यापूर्वी व्यायाम करणे
झोपण्यापूर्वी कधीही व्यायाम करू नये. अशा वेळी व्यायाम केल्याने झोपेचा त्रास होतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्ट्रेचिंग, योगा किंवा ध्यान यांसारखे हलके व्यायाम करू शकता. झोपण्याच्या सुमारे दोन ते तीन तास आधी व्यायाम पूर्ण करावा.