आजकाल तरुण असो वा वृद्ध, प्रत्येक वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला आहे, त्यामुळे तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका येण्याआधी आपल्या शरीरात काही लक्षणे दिसतात. तुम्हालाही जर ही लक्षणे दिसली असतील, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे कोणती आहेत हे आपण आज जाणून घेऊया.
हृदयविकाराच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
- जबडा दुखणे
जबड्याच्या मागच्या भागात दुखणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण असू शकते. यामध्ये वेदना जबड्यापासून सुरू होऊन मानेपर्यंत पसरते. ही वेदना खूप अचानक होते. तुम्हाला याची चिन्हे आधीच दिसत नाहीत.
- हातात मुंग्या येणे
हाताला दुखणे किंवा मुंग्या येणे हे सौम्य हृदयविकाराचे लक्षण आहे. ही वेदना छाती आणि मानेपर्यंत वाढू शकते. ही जोखीम हलक्यात घेणे धोकादायक ठरू शकते.
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण
- अचानक घाम येणे
जर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊ लागला तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून तुमची समस्या सांगा.
- श्वास लागणे आणि चक्कर येणे
पायर्या चढल्यानंतर जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तर तुमचे हृदय नीट काम करत नसल्याचे समजते. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.
- ढेकर येणे आणि ओटीपोटात दुखणे
पोटाशी संबंधित अनेक समस्या हार्ट अटॅकचे लक्षण असू शकतात. ढेकर येणे, पोटदुखी ही सौम्य हृदयविकाराची लक्षणे आहेत.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितूवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांशी संपर्क साधा.)