उन्हाळा सुरु झाला आहे आणि त्याची झळ बसायलासुद्धा सुरुवात झाली आहे. अशावेळी तहान लागणे साहजिक आहे. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे आपल्या शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक आहे. परंतु जर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त तहान लागत असेल तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणे हे एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
सतत आणि गरजेपेक्षा जास्त तहान लागणे ही मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी त्वरित तपासा. यासोबतच मधुमेहाची सुरुवातीची इतर लक्षणे ओळखणेही महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया मधुमेहाच्या लक्षणांविषयी.
तुम्हालाही येत असेल प्रमाणाच्या बाहेर राग, तर ‘या’ टिप्सचा वापर करून मिळवा रागावर नियंत्रण
सतत तहान लागणे :
मधुमेहामध्ये वारंवार तहान लागणे ही समस्या असू शकते. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, तेव्हा मूत्रपिंड ते सहजपणे फिल्टर करू शकत नाहीत. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने वारंवार तहान लागते. याशिवाय, जर तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते.
वजन कमी होणे :
मधुमेही रुग्णांचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. उच्च रक्त शर्करा चरबी साठवण्याच्या मार्गावर परिणाम करते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.
सतत लघवी होणे :
किडनी रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे ही साखर लघवीद्वारे बाहेर पडते. जास्त लघवीमुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते.
मृत्यूच्या आधी माणूस करत असतो ‘या’ गोष्टींचा विचार; वैज्ञानिकांनी शोधून काढली धक्कादायक माहिती
जास्त थकवा आणि डोकेदुखी :
जर तुम्हाला जास्त थकवा, डोकेदुखी, अंधुक दृष्टी आणि जलद हृदयाचे ठोके यांसारखी लक्षणे दिसली तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया खात्री करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.)