शरीरात दिसणाऱ्या लक्षणांच्या आधारे कोणत्याही गंभीर आजारांचा किंवा समस्यांचा वेळीच अंदाज बांधता येतो. मात्र काही लक्षणे तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. या लक्षणांबद्दल लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी. श्वास घेण्यात अडचण ही अशीच एक समस्या आहे, जी सामान्यतः फुफ्फुसाची समस्या किंवा दमा म्हणून ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का, हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
श्वसनाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. फुफ्फुस किंवा हृदयाच्या समस्या गंभीर परिस्थितींमध्ये जीवघेण्या ठरू शकतात, अशा परिस्थितीत सर्वांनीच त्यांच्या प्रतिबंधाबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयाच्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला काही काळापासून अशा समस्या येत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तपासणी करून घ्यावी. वेळेत स्थितीचे योग्य निदान करणे गंभीर समस्यांच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करण्यात उपयुक्त ठरू शकते.
Health Tips : शरीरात ‘या’ कमतरता निर्माण झाल्यावर निर्माण होते गोड खाण्याची इच्छा; वेळीच सावध व्हा
हृदयरोगाची लक्षणे
डॉक्टर म्हणतात, सर्वसाधारणपणे धमन्या ब्लॉक झाल्या तर श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. अनेक कारणांमुळे धमन्यांमधील अडथळे उद्भवू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. श्वास घेण्यात अडचण येणे हे नेहमी हृदयाच्या समस्यांचे लक्षण असू शकत नाही, काही परिस्थितींमध्ये छातीत अस्वस्थता जाणवणे देखील अशा समस्यांना कारणीभूत ठरू शकते. तथापि, या सर्व परिस्थितींवर वेळेवर उपचार करणे आवश्यक मानले जाते. चला जाणून घेऊया इतर कोणत्या कारणांमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक कारणांमुळे श्वास घेण्यास समस्या येऊ शकते. नेमके कारण जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
- ज्या लोकांना अॅनिमियाची (लाल रक्तपेशींची कमी पातळी) समस्या असते त्यांना अनेकदा श्वासोच्छवासाचा त्रास होतो.
- दम्याच्या रूग्णांमध्ये श्वासोच्छवासाची समस्या सामान्य आहे.
- चिंता-तणाव परिस्थिती देखील हा धोका वाढवू शकते.
- हृदय किंवा फुफ्फुसाच्या समस्या.
- ही समस्या धूम्रपान करणाऱ्यांमध्ये दिसून येते.
- कोणत्याही प्रकारचे संक्रमण.
- लठ्ठपणा.
हृदयविकाराचा झटका टाळायचा आहे? तर ‘या’ वयापासूनच तपासायला सुरु करा रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी
श्वसनाशी संबंधित समस्या कशी टाळावी?
हृदय-फुफ्फुसाच्या कोणत्याही गंभीर आजाराशिवाय तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.
- ज्या ठिकाणी केमिकलचा वापर जास्त आहे अशा ठिकाणी जाणे टाळा, केमिकल्समुळे तुमच्या फुफ्फुसाची समस्या वाढू शकते.
- श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने या प्रकारच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
- श्वसनाच्या समस्या टाळण्यासाठी धूम्रपान पूर्णपणे सोडा.
- वजन नियंत्रणात ठेवल्यानेही तुम्हाला फायदा होऊ शकतो.
(येथे देण्यात माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)