Using Phone in Toilet: सध्या फोनचे व्यसन एवढं वाढलंय की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांना मोबाईलचा मोह सोडता येत नाही. बघावं तो मोबाईलमध्ये गुंतून असतो. या मोबाईलच्या नादात त्या व्यक्तीला हेही माहित नसतं की, आजूबाजूला काय घडतंय. मोबाईलची सवय एवढी झालीये की आता लोक टॉयलेटला जातानाही फोन सोबत घेऊन जातात. पण टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय वाईट आहे. टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या सवयीचा आरोग्यावर कसा परिणाम होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोट फुगणे आणि जुलाबाची समस्या

टॉयलेटमध्ये फोन वापरल्यानंतर, बहुतेक लोक त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत आणि बरेच लोक फोन वापरल्यानंतर हात न धुता अन्न खायला लागतात, ज्यामुळे त्यावरील बॅक्टेरिया हातांद्वारे तुमच्या पोटात पोहोचतात. त्यामुळे डायरिया, यूटीआय आणि पचनाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोट आणि आतड्यांमधील अंतर्गत भागांमध्ये जळजळ देखील होऊ शकते.

(हे ही वाचा: Swine Flu: करोनाच्या मध्येच आता स्वाईन फ्लूने वाढवली लोकांची चिंता; जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधाच्या पद्धती)

मूळव्याध समस्या

पचनसंस्थेत बिघाड झाल्यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध यांसारख्या समस्या उद्भवतात. पण यामागे आणखी एक कारण आहे, तुम्ही मोबाईलही ठेवू शकता. टॉयलेटमध्ये बराच वेळ बसल्याने अनावश्यक दबाव येतो. त्यामुळे मूळव्याध आणि फिशर होण्याची शक्यता वाढते.

संसर्गाचा धोका

शौचालय हे धोकादायक जंतू आणि जिवाणूंचे घर आहे आणि जेव्हा लोक येथे बसून मोबाइल वापरतात आणि त्यानंतर त्याची स्वच्छता करत नाहीत. त्यामुळे त्यावर चिकटलेले बॅक्टेरिया पोटदुखी आणि मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय) सारख्या संसर्गाचे कारण बनतात.

( हे ही वाचा: व्हायरल ताप असल्यास लगेच औषधे खाऊ नका; जाणून घ्या लवकर बरं होण्यासाठी सर्वात सोपा उपाय)

बॅक्टेरियाचा हल्ला

जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये बसून तुमचा स्मार्ट फोन वापरता तेव्हा धोकादायक जंतू तुमच्या मोबाईलला चिकटून राहतात. टॉयलेट वापरल्यानंतर तुम्ही तुमचे हात धुता पण मोबाईल फोन स्वच्छ करणे फारसे आठवत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यावर चिकटलेले धोकादायक जंतू, टॉयलेट, बेडरूम, किचन आणि डायनिंग किंवा त्याहीपेक्षा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जीवाणू पोहोचतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you also use mobile phone in toilet be careful in time otherwise this will face serious consequences gps