अनेकदा आपल्या घरी रात्रीचे जेवण शिल्लक असते किंवा आपण सकाळी शिजवलेले अन्न रात्री उशिरापर्यंत खातो. यामुळे आपल्याला पचनाचे अनेक आजार होऊ शकतात. तसेच डॉक्टर देखील सल्ला देतात की आपण ताजे तयार अन्न खावे. तर आयुर्वेदात तुम्हाला अन्नाबद्दल ताजे गरम गरम अन्न खाण्याचे सल्ले देखील देण्यात येतात. यावेळी आयुर्वेद तज्ञ डॉ वरलक्ष्मी यनामंदरा यांनी उरलेल्या अन्नाबद्दल संगितले की, २४ तासांपूर्वी शिजवलेले अन्न न खाणे योग्यतेचे आहे. कारण २४ तास आधी तयार शिजवलेले अन्न खाल्ल्याने तुम्हाला अपचन होऊ शकते.
आजच्या या धावपळीच्या आणि वेळेच्या कमतरतेमुळे तुम्ही शिजवलेले अन्न बहुतेकदा फ्रीजमध्ये ठेवता. त्यानंतर तेच अन्न तुम्ही पुन्हा गरम करून खाता. पण आयुर्वेदात ते चुकीचे मानले जाते.तसेच यावेळी आयुर्वेद तज्ञ वरलक्ष्मी यांनी संगितले की, ‘जेव्हा आपण अन्न शिजवतो, तेव्हा त्यात पुरेसा ओलावा असतो. पण जेव्हा आपण ते फ्रिजमध्ये साठवतो, तेव्हा त्यात अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे जंतू आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. ज्याचे आपण सेवन केल्याने आपल्याला अनेक आजार उद्भवू शकतात.
मायक्रोवेव्हमध्ये अन्न पुन्हा गरम करणे देखील आयुर्वेदात योग्य मानले जात नाही. कारण थंड अन्न पुन्हा गरम केल्याने जीवनसत्त्वे सारख्या आवश्यक पोषक तत्त्वांचा नाश होतो. याकरिता तुम्ही अन्न पुन्हा गरम करताना ते हलके गरम करावे. त्याच बरोबर ताजे अन्न तुमच्या हृदयाला देखील पोषण देते. परंतु जर अन्न व्यवस्थित हाताळले नाही तर तुम्हाला फूड पॉयजन देखील होऊ शकतो.
तुम्ही प्रत्येक वेळी अन्न ताजे बनवू शकत नसाल तर या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा
अन्न शिजवल्यानंतर ९० मिनिटांच्या आत ते स्टोर करा. त्याचबरोबर अन्न थंड झाले आहे का याची देखील खात्री करा.
फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न एकापेक्षा जास्त वेळा गरम करू नका.
तुम्ही जेव्हा अन्न गरम कराल तेंव्हा हे लक्षात ठेवा की, अन्न जास्त गरम नसावे, ते पोषक घटकांचा नाश करेल. गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरू नका.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.)