आपल्यापैकी अनेकांना पालक भाजी खूप आवडते. पालकमध्ये लाल आणि हिरवा, असे दोन प्रकार दिसतात. अनेक जण सहसा हिरवा पालक खरेदी करतात. तुम्हीसुद्धा हिरवा पालक खाता का? पण तुम्हाला माहीत आहे का? हिरवा आणि लाल पालक यामध्ये कोणता सर्वांत जास्त आरोग्यासाठी फायदेशीर आहे? आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या.

  • सध्या धावपळीच्या जीवनात माणसाच्या लाइफस्टाईलमुळे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. अशात वजनवाढीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, लाल पालक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. लाल पालकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अतिभूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हेही वाचा : नवऱ्यांनो, परफेक्ट बायकोमध्ये असतात हे पाच गुण; एकदा वाचाच…

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
  • लाल पालकमधील प्रोटीन्स रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवतात. या पालकमध्ये असलेल्या तंतुमय पदार्थांमुळे पचनशक्तीसुद्धा वाढते.
  • लाल पालकमध्ये लोहाची मात्रा अधिक असते. या पालकचे सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि शरीरात कधीही
    रक्ताची कमतरता भासत नाही.
  • काही अभ्यासांतून असेही समोर आले आहे की लाल पालकच्या सेवनामुळे किडनीचे आरोग्य सुदृढ राहते आणि किडनीतील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

हेही वाचा : ‘या’ वयात करा लग्न; दीर्घकाळ टिकेल नातं; वाचा संशोधन काय सांगते …

  • लाल पालकमध्ये व्हिटामिन के असते. हा पालक हाडे मजबूत करण्यास मदत करतो. त्याशिवाय पालकमध्ये फाइटोस्ट्रोलची मात्रासुद्धा असते; ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
  • लाल पालकमध्ये औषधी गुणधर्म अधिक आढळतात. आफ्रिकेत गॅस्ट्रोच्या समस्येसाठी लाल पालकचा उपयोग हर्बल उपचार म्हणून केला जातो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)