खूप जास्त तणावात, थकलेले किंवा कंटाळलेले असताना तुम्हाला देखील सतत काही ना काही खाण्याची सवय आहे का? घरात असताना सद्यस्थितीत विशेषतः या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये अनेकांमध्ये दिवसा होणाऱ्या क्रेविंगच आणि तणावात किंवा कंटाळले असताना खाण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं. पण अशा पद्धतीने खाणं योग्य आहे का? मुळात अशावेळी आपल्याला खरंच भूक लागलेली असते कि ही फक्त भावनिक भूक आहे? याचा तुम्ही विचार केलाय का? जरूर करायला हवा. अन्यथा आपल्या आरोग्यसाठी हे घटक ठरू शकतं.
भावनिक भूक आणि प्रत्यक्ष भूक म्हणजे काय?
भावनिक भूक म्हणजे काय? तर अति तणावात किंवा भावनिक असताना जाणवणारी भूक ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये इमोशनल हंगर (Emotional Hunger) असं म्हणतात. तर प्रत्यक्षात शरीराला अन्नाची गरज असताना लागणारी भूक म्हणजेच अॅक्चूअल हंगर (Actual Hunger) असे हे भूकेचे दोन प्रकार आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डी हिने या महत्त्वाचा विषयाला हात घातला आहे. समीरा रेड्डी ही सतत आपल्या फॉलोअर्सना आपल्या फिटनेस प्रवासाची सैर घडवत असते. अगदी वर्कआउट व्हिडिओ शेअर करण्यापासून शरीराच्या सकारात्मकतेबद्दल लोकांना प्रेरणा देण्यापर्यंत सर्व लहान-मोठे अनुभव आणि मार्ग ती शेअर करत असते. आतासुद्धा तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर खरी (प्रत्यक्ष) भूक आणि भावनिक भूक यातील संतुलन याबाबत भाष्य केलं आहे.
अभिनेत्री समीरा रेड्डी आपल्या या अनुभवाबाबत सांगताना म्हणते कि, “अनेक लोक सतत आहार आणि हेल्थी खाण्याबद्दल बोलत असतात. परंतु, त्यात सातत्य राखणं इतकं कठीण आणि आव्हानात्मक का आहे? हे जाणून घेणं खरंच महत्त्वाचं आहे. मी गेल्या ६ महिन्यांत सातत्य ठेवून व्यायामाच्या मदतीने जवळजवळ १० किलो वजन कमी केलं आहे. मात्र, या काळात मला माझी भावनिक भूक नियंत्रित करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. माझ्यासाठी ते मोठं आव्हान होतं. कारण, जेव्हा तुम्हाला खूप लो, थकल्यासारखं किंवा नकारात्मक वाटतं असतं तेव्हा आपल्याला अनेक पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा अर्थात क्रेविंग होते. मला वाटतं की मी माझे हे फूड ट्रिगर्स ओळखले. म्हणून मी त्यावर नियंत्रण ठेवू शकले.”
प्रत्यक्ष भूक आणि भावनिक भूक कशी ओळखाल? अभिनेत्री समीरा रेड्डी लिहिते…
प्रत्यक्ष भूक कशी असते?
- हळूहळू जाणवते
- मी योग्य प्रमाण खाता आणि तुमचं पोट व्यवस्थित भरतं
- खाऊन झाल्यानंतर कोणतीही नकारात्मक भावना किंवा गिल्ट राहत नसतं
- विशिष्ट असाच एखादा पदार्थ खायचा आहे असा हट्ट नसतो.
भावनिक भूक कशी असते?
- अचानक आणि तीव्रतेने जाणवते
- खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं. मात्र पोट भरल्यासारखं वाटतं नाही
- खाऊन झाल्यानंतर एक नकारात्मक भावना येत राहते
- विशिष्ट असाच पदार्थ खायचा असतो. अनेकदा ते जंकफूड असतं
संतुलन कसं राखाल?
अभिनेत्री समीरा रेड्डी हिने आपल्या पोस्टमध्ये ह्यावर काही उपाय सुचवले आहेत, पाहुया
- जेव्हा तुम्हाला असं क्रेविंग होऊन तेव्हा भरपूर पाणी प्या आणि ही क्रेविंग संपण्याची वाट पाहा.
- आपली यामागची कारणं शोधा आणि जागरूक जागरूक रहा.
- चांगली झोप घ्या. ताण आणि थकवा दूर करण्यास मदत होईल. यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा देखील कमी होईल.
- रात्री उशिरा खाणं टाळा.
- खाण्याचं प्रमाण आणि वेळांकडे लक्ष ठेवा.
- स्वतःची फूड डायरी तयार करा. त्यात सगळ्या नोंदी ठेवा.
- दिवसभर सतत हालचाल सुरु ठेवा.
- स्वतःची अशी शांत जागा शोधा ती ह्या सगळ्यात तुम्हाला अधिक मदत करेल.
हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आणि होलिस्टिक वेलनेस कोच करिश्मा शहा हाच विषय अधिक स्पष्ट करताना म्हणाल्या कि, “जेव्हा आपलं शरीर तणावाच्या स्थितीत असतं, तेव्हा अन्नाच्या बाबतीत चुकीच्या निवडी करण्याकडे आपला कल जास्त असतो. यावेळी विशेषतः जंक फूड, साखर आणि तळलेले पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. अशा पद्धतीच्या भावनिक खाण्याला अविचारी खाणं असं देखील म्हटलं जात. कारण, तेव्हा भूक नसतानाही आपण फक्त आपल्या तोंडात काही ना काही अन्न सतत चघळत राहतो. आपल्या तणावाचा सामना करण्याचा आणि त्यापासून आराम मिळवण्याचा हा एक मार्ग आहे.” करिश्मा शहा यावेळी इंडियन एक्सप्रेसशी बोलत होत्या.
दुसऱ्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, जेव्हा आपण मानसिकरित्या प्रचंड थकलेले असतो आणि आपल्या मनाला त्या तणावाला सामोरे जाण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते जे प्रामुख्याने जंक फूडच असतं.
आपली भावनिक भूक कशी नियंत्रित करावी?
करिश्मा शहा यांनी आपली भावनिक भूक नियंत्रित करण्याचे काही मार्ग सुचवले आहेत.
- खाण्यापूर्वी रिलॅक्स व्हा आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
- अन्न व्यवस्थित चावून खा.
- आपल्या स्वयंकपाक घरात अनहेल्थी, जंक किंवा पॅक्ड फूड कमी ठेवा
- लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही बघत जेवू नका. त्यामुळे, तुमचं जेवणाकडे लक्ष उरत नाही.