रोज सकाळी लवकर उठणे अनेकजणांना कठीण जाते. अलार्म बंद करून आणखी काही मिनिटं झोपता यावे असे प्रत्येकालाच वाटते. रोजच्या प्रवासाची दगदग, कामाचा ताण यामध्ये पुरेशी झोप न मिळणे साहजिक आहे, त्यात ८ तास झोप मिळाली तरी काहीजणांना सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. मग सकाळी उठल्यावर पटकन चहा, कॉफी पिऊन किंवा अंघोळ करुन हा थकवा घालवला जातो. जर असा थकवा सतत जाणवत असेल तर, याचा तुमच्या मूडवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा थकवा घालवण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. काही सवयी या थकव्यासाठी कारणीभूत असतात. कोणत्या आहेत या सवयी आणि त्यात काय बदल करणे आवश्यक आहे जाणून घ्या.

झोपेच्या या सवयींमुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो

What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
How do you manage salary expenditures
कर्मचाऱ्यांनो​, महिन्याचा पगार लगेच संपतो; पगाराचे कसे नियोजन करावे? जाणून घ्या, खास टिप्स
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
badlapur school sexual abuse article about incidentof girls sexual assault in school
…तर शाळा बंद होतील!
  • झोपेत असताना अलार्म वाजला की तो बंद करून पुन्हा झोपण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. पण यामुळे तुम्हाला अधिक थकवा जाणवू शकतो. कारण यामुळे गाढ झोपेवर परिणाम होतो. तुम्ही जागे होऊन अलार्म बंद करून पुन्हा झोपता, या सवयीमुळे तुम्हाला गाढ झोप लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि उठल्यानंतर थकवा जाणवू शकतो.
  • कॅफीनयुक्त पदार्थ (उदा. चहा, कॉफी) तसेच अल्कोहोल यांमुळे शरीरातील नर्वस सिस्टिम उत्तेजित होते. त्यामुळे गाढ झोपेवर परिणाम होतो आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो.
  • तुमच्या क्रोनोटाईपनुसार झोपेची वेळ निवडणे आवश्यक आहे. काही जणांना रात्री गाढ झोप लागते, तर काहींना सकाळी. झोपेच्या या विशिष्ट सवयीला क्रोनोटाईप म्हणतात.
  • तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथल्या वातावरणाचा देखील झोपेवर परिणाम होतो. त्या खोलीतील तापमान, लाईट, बाहेरचा आवाज हे झोप पूर्ण न होण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि त्यामुळे सकाळी थकवा जाणवू शकतो.
  • झोप पूर्ण न होण्यामागे ‘स्लीप डिसऑर्डर’ हे कारण देखील असु शकते. इनसोमनिया, नार्कोलेप्सी, स्लीप ॲप्निया हे ‘स्लीप डिसऑर्डर’ चे काही प्रकार आहेत. या आजारांमुळे झोप पूर्ण न होत असल्याने थकवा जाणवू शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.