Morning dizziness: अनेक जण तक्रार करतात की रात्री आठ-नऊ तास पूर्ण झोप घेतल्यानंतरही सकाळी थकल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत त्यांना दिवसाची सुरुवात करण्यास उशीर होतो, पण या थकव्यामुळे दिवसभर फ्रेश वाटत नाही. तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल, तर आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय सांगत आहोत.
सकाळी उठल्यावर थकवा का जाणवतो?
सकाळी उठल्यावर थकवा जाणवण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु, जर तुम्ही रात्रीची सात ते नऊ तासांची झोप पूर्ण केली असेल आणि तरीही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अशक्तपणा जाणवतो किंवा थकवा जाणवतो, तर यामागे ते निर्जलीकरणामुळे असू शकते.
हेही वाचा: Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
खरंतर रात्री झोपताना शरीर स्वतःला दुरुस्त करते. यावेळी तुमचे शरीर हार्मोन्स सोडते, जे पेशींच्या दुरुस्तीसाठी मदत करतात. या सर्व प्रक्रियेमध्ये शरीराला जास्त मेहनत करावी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते किंवा शरीर निर्जलीकरण होते. यामुळे तुमचे डोके दुसऱ्या दिवशी जड होते आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
हेही वाचा: नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
अशा स्थितीत सकाळी फक्त पाणी प्यायल्याने तुम्हाला बरे वाटू शकते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीर रिहायड्रेट होते, ज्यामुळे रात्रभर शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते.
अशा परिस्थितीत सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा, यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस चांगल्या पद्धतीने घालवता येईल.