दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शरीराचे दुखणे वाढत आहे. त्यामुळे अनेकांना पाठदुखी, पायदुखी, गुडघेदुखी, मानदुखी सारख्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात. यावर उपाय म्हणून नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे.
सध्या धावपळीच्या या जगात पायदुखीची समस्या वाढली आहे. दिवसभर काम केल्यानंतर अनेक लोकांचे रात्री पाय दुखतात. तुम्हालाही पाय दुखीची त्रास आहे का? जर असेल तर टेन्शन घेऊ नका. डॉ. मयुरी चांडक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पायदुखीचा त्रास कमी करण्यासाठी झोपताना कोणते व्यायाम करावे, याविषयी सांगितले आहेत.
या व्हिडीओमध्ये डॉ. मयुरी चांडक यांनी काही व्यायामाचे प्रकार करून दाखवले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सुरुवातीला त्यांनी दोन्ही पाय भिंतीला टेकवून सरळ झोपण्यास सांगितले आहे आणि त्यानंतर पायाचे तळवे वर-खाली करण्यास सांगितले आहे. त्यानंतर दुसऱ्या व्यायामाच्या प्रकारात त्या निद्रा स्थितीत दिसत आहेत. एक पाय खाली आणि एक पाय वर करताना दिसत आहे. वर केलेल्या पायाचा तळवा वर-खाली करण्यास सांगतात. त्यानंतर शेवटी कसे झोपावे याविषयी सांगितले आहे. गुडघ्याखाली उशी ठेवून झोपण्याचा सल्ला दिला आहे. व्यायामाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा : Weightloss Exercise: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी करावा की संध्याकाळी? घ्या जाणून…
dr_mayuri_physio_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रात्री झोपताना खूप पाय दुखतात? झोपताना हे व्यायाम करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे मी रोज करते” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी हे व्यायाम नियमित करते”