Yoga for Snoring : अनेक लोकांना घोरण्याची सवय असते. घोरणे थांबवण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात पण काहीही फायदा होत नाही. काही लोक घरगुती उपाय, औषधोपचार घेतात मनासारखा परिणाम दिसून येत नाही. आज आम्ही तुम्हाला घोरणे कमी करण्यासाठी योगा सांगणार आहोत.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये मृणालिनी यांनी घोरण्यासाठी उपयुक्त ठरतील असा योगा सांगितला आहे.
मृणालिनी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल आदिमुद्रा स्थितीत दररोज १५ मिनिटे बसण्यास सांगितले आहे. यामुळे श्वसन संबंधित आजार दूर होतात.योग अभ्यासक मृणालिनी यांनी व्हिडीओमध्ये आदिमुद्रा स्थितीत कसे बसायचे आहे, हे सुद्धा सांगितले आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे आदिमुद्रा स्थितीत अंगठ्याला करंगळीच्या तळापाशी ठेवा व इतर बोटे अश्या प्रकारे बंद करावी जेणेकरून हलकी मुठ बनेल आणि हात मांडीवर ठेऊन दीर्घ श्वास घ्या.
हेही वाचा : अर्ध्या तासात कंगव्यातील मळ होईल गायब; कंगवा करा नव्यासारखा स्वच्छ, पाहा VIDEO
yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे काही लोकं घोरतात. श्वसन मार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे तेथील टिश्यू कंप पावू लागतात आणि तो मार्ग जितका अरुंद तितका कंप पावण्याचा आवाज जास्त होतो.”
मृणालिनी यांनी आदिमुद्रेमुळे होणारे फायदे सुद्धा सांगितले आहे.
आदिमुद्रेच्या सरावाने घोरण्याची समस्या कमी होते.
फुफ्फुसाची जळजळ कमी होण्यास मदत होते.
श्वसन प्रणाली मजबूत होण्यास मदत होते.
याशिवाय त्यांनी काही पर्यायी योगा सांगितले आहेत ज्यामुळे घोरण्याबरोबरच इतर श्वसनाच्या समस्या कमी होऊ शकतात
१. उज्जयी प्राणायाम
२. सिंहगर्जना
त्यापुढे कॅप्शनमध्ये लिहितात, “घोरणे थांबवण्यासाठी अजून एक सोपा उपाय म्हणजे वाफ घेणे, वाफ घेतल्यामुळे श्वसन मार्ग मोकळा होतो.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली” काही युजर्सनी प्रश्न विचारले आहेत तर काही युजर्सनी मृणालीनी यांचे आभार सुद्धा मानले आहे.