Viral Video : हिवाळ्यात अनेकांना सायनस आणि इतर श्वसनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. श्वास घेण्यास अनेकांना अडचण येते. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन किंवा औषध घेऊन आराम पडत नाही. अशावेळी काय करावे, हे सुचत नाही. टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला सायनस किंवा इतर श्वसनाशी संबंधित समस्या असेल तर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये एका प्राणायामाच प्रकार सांगितला आहे. हे प्राणायाम कसे करावे, यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (do you have sinus and breathing problems do bhastrika pranayama watch how to do it video goes viral)
योग शिक्षिका प्रणाली यांनी त्यांच्या yogpranali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भस्त्रिका प्राणायाम विषयी सांगितले आहे. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे हा प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते. शरीरातील अशुद्धता दूर होण्यास मदत होते.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला योग शिक्षिका प्रणाली भस्त्रिका प्राणायाम कसे करावे, हे सांगताना दिसत आहे.
सुरुवातीला खोलवर श्वास घ्या. दोन्ही हात सरळ वर करा त्यानंतर मुठी उघडा. जोराने श्वास सोडा व हात खाली आणा आणि मुठी बंद करा. यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
yogpranali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भस्त्रिका प्राणायाम आपली फुफ्फुसाची क्षमता वाढवत असल्याने, हा प्राणायाम शरीरातील अशुद्धता काढून टाकण्यास मदत करतो. हे सायनस आणि इतर श्वसन समस्यांमध्ये मदत करते. इंद्रियांची आकलन शक्ती वाढते. हा प्राणायाम दोष संतुलित करण्यास मदत करते.
कोणती काळजी घ्यावी?
रिकाम्या पोटी याचा सराव केल्याची खात्री करा. गरोदर महिलांनी हे टाळावे. जर तुम्हाला चक्कर येत असेल तर ब्रेकचा कालावधी वाढवा. जर तुम्हाला हायपरटेन्शन आणि पॅनिक डिसऑर्डरचा त्रास होत असेल तर ते योग शिक्षकांच्या देखरेखीखाली करा.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.