Daily Practice for Relief From Chest Pain : सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. व्यायामाकडे दुर्लक्ष, पोषक आहाराची कमतरता यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढतात. कामामुळे तणाव वाढतो. काम करत असताना अचानक छाती दुखायला लागली, असं तुमच्याबरोबर कधी झालं का? तुम्हाला माहितीये, असं का होतं? आणि त्यासाठी काय करायला पाहिजे. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
हेल्थ आणि लाइफस्टाइल कोच साक्षी देसाई यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यांनी छाती दुखत असेल तीन गोष्टींची प्रॅक्टिस करण्याचा आणि स्वतःला रिलॅक्स करण्याचा सल्ला दिला आहे.
या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
काम करत असताना मध्येच छाती दुखत असेल तर समजून जा तुम्ही तुमच्या शरीराला जास्त स्ट्रेस देताय. त्यासाठी एक प्रॅक्टिस करा आणि स्वत:ला रिलॅक्स करा.
सर्वात आधी तुम्हाला सोयीस्कर असेल त्या स्थितीमध्ये बसा. त्यानंतर फुल Yogic श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. त्यानंतर नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने श्वास सोडायचा त्यानंतर हलक्या हाताने छातीवर टॅपिंग करा. हा व्हिडीओ सेव्ह करा आणि प्रॅक्टिस करा.
हेही वाचा : Skipping Breakfast : घाईघाईत सकाळचा नाश्ता टाळता? मग तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ तीन मुद्दे नक्की समजून घ्या
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
_the_wellness_wave या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तणावामुळे छाती दुखत असेल तर या ३ गोष्टींची प्रॅक्टिस करा आणि स्वतःला रिलॅक्स करा”
हेही वाचा : “सकाळी ब्लॅक कॉफी प्यायल्याने…”, बॉलीवूड अभिनेता वरुण धवनच्या वक्तव्यावर झाली टीका, पण तज्ज्ञ म्हणाले…
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे खरंच काम करतं” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप छान माहिती देता” आणखी एका युजरने लिहिलेय, “कालच मला अशा प्रकारचा त्रास झाला होता पण मी पाणी प्यायलो तरी कमी झाला नाही.. आता तुम्ही सांगितलं स्ट्रेस घेतल्यामुळे असं होत असतं, आता लक्षात आले.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला पण आहे ही समस्या मी तर इसीजी केलं घाबरून पण सगळं नीट आहे पण असं का होतं हेच कळलं नाही मला”
एक युजर लिहितो, “माझ्या छातीमध्ये डाव्या बाजूला गेले काही महिने दुखत होते आणि अचानक चमकत होते, मी चांगल्या नामांकीत हृदयरोग तज्ञांचा सल्ला घेतला आहे. इसीजी, इको टी एम टी टेस्ट केल्या आहेत. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही अजून तसं होतंच, गेली दीड दोन वर्षे मी भरपूर स्ट्रेस आणि तणावामध्ये पण आहे. नक्की कशामुळे होत असेल आणि काय करावे?” अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव सांगितले. काही युजर्सनी आभार सुद्धा व्यक्त केले आहेत.