Storing Banana In Fridge: केळी असे फळ आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतात. केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात अनेकजण उपवासाला केळी खातात, कारण केळी खाल्ल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. पण, केळी खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही घरी फ्रिजमध्ये ती ठेवता का? अशी चूक कधीही करू नका. आज आपण फ्रिजमध्ये केळी ठेवणे किती धोकादायक असते, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका केळी

केळीची शेती उष्ण वातावरणात केली जाते. त्यामुळे केळीला आपण जास्त वेळ थंड ठिकाणी ठेवू शकत नाही. थंड ठिकाणी ठेवल्यानंतर केळी काळी पडतात आणि खाण्यायोग्य राहत नाही. जेव्हा तुम्ही केळी फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा ऑक्सीडाइज एन्जाइम तयार होतो, ज्यामुळे केळी खराब होऊ शकतात.
जर केळी पिकलेली नसतील तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. पण, केळी पिकल्यानंतर लगेच फ्रिजच्या बाहेर ठेवा, कारण जास्त दिवस केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होऊ शकतात.

हेही वाचा : मुलींनो, लग्नाला होकार देण्याआधी जोडीदाराबरोबर ‘या’ गोष्टींवर एकदा चर्चा करा, नाहीतर वैवाहिक जीवनात येऊ शकतात अडचणी

आठवडाभर केळी ताजी ठेवायची असेल तर…

  • केळी ताजी ठेवायची असतील तर केळीच्या देठावर फॉइल पेपर किंवा प्लास्टिक किंवा एखादा कागद गुंडाळा.
  • याशिवाय केळी नेहमी हॅन्गरवर लटकवून ठेवा. टोपलीत किंवा भांड्यामध्ये चुकूनही केळी ठेवू नका.