Lips care : प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की, आपण सुंदर दिसावं. सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया अनेकदा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. अनेकदा काजळ, फेस पावडर, लिपस्टिक लावल्याशिवाय महिला घराच्या बाहेरसुद्धा पडत नाहीत. लिपस्टिक लावणे तर महिलांना खूप जास्त आवडते.
तुम्हालाही नियमित लिपस्टिक लावायची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- आज आपण नियमित लिपस्टिक लावल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, याविषयी जाणून घेणार आहोत.

लिपस्टिकमध्ये असतात रसायने

  • लिपस्टिक बनवण्यासाठी ज्या रसायनांचा उपयोग केला जातो, ती रसायने आपल्या आरोग्यासाठी आणि विशेष म्हणजे ओठांच्या त्वचेसाठी चांगली नसतात.
  • जेव्हा तुम्ही ओठांवर लिपस्टिक लावता, तेव्हा ओठांवरच्या त्वचेवरील छोटी छिद्रे बंद होतात; ज्यामुळे तुमचे ओठ वारंवार सुकतात.

हेही वाचा : फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी….

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral video of a man fell into boiled water shocking video on social media
VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच

नियमित लिपस्टिक का लावू नये?

  • नियमित लिपस्टिक लावल्यामुळे तुमच्या ओठांचा खरा रंग नाहीसा होतो आणि ओठ काळे पडतात.
  • लिपस्टिकमधील रसायनांमुळे ओठांच्या सुंदरतेची हानी
  • लिपस्टिकमध्ये हानिकारक रसायने असतात. जर तुम्ही दररोज लिपस्टिक लावत असाल, तर स्किन ॲलर्जीचा धोका वाढतो.
  • अनेक महिला पैसे वाचवण्यासाठी कमी दर्जाच्या लिपस्टिक खरेदी करतात; पण असे करू नये. अशी लिपस्टिक नियमित लावल्यामुळे तुमचे चांगले ओठ खराब होऊ शकतात.

हेही वाचा : How to Stop Snoring : तुमच्या जोडीदाराला घोरण्याची सवय आहे का? या ट्रिक्सच्या मदतीने करा त्यांची सुटका!

लिपस्टिक खरेदी करताना…

  • लिपस्टिक खरेदी करताना लिपस्टिकवर दिलेली सूचना वाचावी. सूचना न वाचल्यामुळे अनेकदा महिलांना लिपस्टिक लावल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
  • लिपस्टिक विकत घेताना नेहमी ‘एक्स्पायरी डेट’ (मुदत संपण्याची तारीख) तपासून घ्यावी. लिपस्टिकच्या या मुदत संपण्याच्या तारखेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. अशा लिपस्टिकचा वापर केल्यामुळे ओठसुद्धा काळे पडतात.
  • ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताना तुमची फसवणूकसुद्धा होऊ शकते. त्यामुळे लिपस्टिक ऑनलाइन खरेदी करू नये.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader