Viral Video : मेकअप हा प्रत्येकाच्या आवडी निवडीचा प्रश्न आहे. काही लोकांना मेकअप करायला आवडतं तर काही लोकांना मेकअप करायला आवडत नाही. काही असेही लोक असतात की ज्यांना मेकअप तर करायचा असतो पण मेकअप करता येत नाही. तुम्हालाही मेकअप करता येत नाही का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण फक्त १० स्टेप्सच्या मदतीने आज आपण परफेक्ट मेकअप कसा करायचा, हे जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मेकअपच्या खास टिप्स सांगणारे व्हिडीओ नेहमीच चर्चेत येतात. सध्या असाच एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये १० स्टेप्समध्ये मेकअप करण्याची पद्धत दाखवली आहे. या दहा स्टेप्सच्या मदतीने तुम्ही परफेक्ट मेकअप करू शकता. अनेकांना प्रश्न पडतो की मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट वापरायचे आणि कोणत्या क्रमानुसार हे प्रोडक्ट वापरायचे, त्यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नोटपॅड दिसेल. या नोटपॅडवर लिहिलेय, “दहा स्टेप्समध्ये मेकअप करण्याची योग्य पद्धत.
१. मॉईश्चरायझर
२. प्रायमर
३.फाउंडेशन
४. कन्सिलर
५. फाउंडेशन पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर
६.आयशॅडो
७. आयलायनर
८.मस्कारा
९. लिपस्टिक
१०. ब्लश, हायलायटर”

या व्हिडीओमध्ये या दहा स्टेप्स नोटपॅडवर लिहिलेल्या दिसत आहे. या दहा स्टेप्सच्या मदतीने क्रमवारानुसार तुम्ही परफेक्ट मेकअप करू शकता. त्यामुळे ज्यांना मेकअप करता येत नाही, त्यांना हा व्हिडीओ फायदेशीर ठरेल.

हेही वाचा : निसर्गाची किमया! चक्क झाडाच्या खाली दडलेली आहे ही रहस्यमय गुहा, व्हिडीओ होतोय व्हायरल

karishma__makeupartist या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मेकअप करण्याची योग्य पद्धत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद, खूप छान माहिकी दिली.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान” आणखी एका युजरने विचारलेय, “सनस्क्रीन का लिहिले नाही?” अनेक युजर्सना हा या दहा स्टेप्स आवडल्या आहेत. काही लोकांनी या व्हिडीओवर त्यांचे प्रश्न सुद्धा विचारले आहेत.