नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी तुम्हाला खाता येईल असा पदार्थ म्हणून मुसली लोकप्रिय आहे. परंतु मुसलीबरोबर बाजरी एकत्र केल्याने आपल्या आरोग्यास अतिरिक्त पोषकद्रव्ये देखील मिळतात. मुसली हा रेडी टू इट असा एक लोकप्रिय नाश्त्याचा पर्याय आहे. यामध्ये ओट्स, फळ, ड्रायफ्रुट्स आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. दिवसाचे पहिले जेवण अर्थात नाश्ता सर्वात महत्वाचा असतो. म्हणूनच नाश्त्यासाठी मुसली हा उत्तम पर्याय आहे. आपल्या दिवसाची किक-स्टार्ट सुरुवात करण्यासाठी प्रोटीन आणि फायबरयुक्त मुसली आवर्जून खा. मुसली बनवतांना त्यात फक्त दूध घालायचे असल्यामुळे हा पटकन तयार होणारा नाश्ता आहे.
मुसलीचे फायदे
१. मुसली हे इतर तृणधान्यांपेक्षा निश्चितच आरोग्यदायी आहे आणि सँडविच किंवा डोनटच्या तुलनेत साखर आणि कॅलरी यात कमी असतात.
२. मुसलीमध्ये विशेषत: फायबर आणि धान्य जास्त असते. हे दोन्ही पाचन तंत्राचे नियमित ठेवण्यास मदत करतात.
३. मुसलीमुळे बर्याच काळासाठी आपले पोट भरलेले राहते.
४. मुसेलीमध्ये ओट्स हा एक महत्वाचा घटक आहे जो हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.
५. नॉन-ग्लूटीनस अॅसिड फ्री बाजरी हे तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीज सारख्या पोषक द्रवांचा चांगला स्रोत आहे, जे निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे.
६. मुसली हा पौष्टिक गुणधर्मांनी भरलेला संतुलित आहार आहे. ज्यामुळे हृदयाच्या समस्येचा धोका कमी होतो.
७. बाजरीसह मुसलीचा एक बाउल आपल्या आहारात प्रथिने, ओमेगा अॅसिडस्, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियमचा समावेश करण्याचा एक चांगला मार्ग आहे.