आपण दुकानात सामान आणायला गेल्यावर टोमॅटो सॉस द्या किंवा टोमॅटो केचअप द्या, असं आपण अगदी सहज म्हणतो. आपल्याला सॉस काय किंवा केचप हे समानच वाटतं. टोमॅटो असणे महत्त्वाचे असे आपल्याला वाटते. टोमॅटो-केचपचा रंगही समान असतो. टोमॅटोची चवही असते. त्यांची पाकिटेही बऱ्यापैकी सारखी असतात. ब्रँडनुसार चव वेगळी असते. त्यामुळे बहुतांश लोक सॉस आहे का केचप हे बघत नाहीत. त्यांना वाटते चव किंवा पदार्थ एकच आहे. फक्त नावं वेगवेगळी आहेत. परंतु, सॉस आणि केचप दोन्ही पदार्थ पूर्णतः वेगळे आहेत. त्यांची चव वेगळी आहे. कोणत्या पदार्थासह सर्व्ह करावे, याचे नियमही वेगळे आहेत. टोमॅटो सॉस आणि केचपमधील फरक जाणून घेऊया…
सॉस आणि केचअप म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर लाल रसरशीत टोमॅटो आपोआप तरळतात. आपण जरी या पदार्थाची टोमॅटोशी गाठ मारलेली असली तरी टोमॅटो प्रचलित होण्यापूर्वीही सॉस व केचअप अस्तित्वात होतेच. चीनमध्ये खारवलेले मासे आणि मसाले यांचे मिश्रण बनवले जाई. त्याला Koe-Chiap म्हणत. चीनकडून मलेशिया, इंडोनेशिया या प्रांतांनी ही पाककृती स्वीकारत त्या पदार्थाला काय-चॅप असे नाव दिले. ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या देशातला हा पदार्थ इंग्रजी कुककडून अमेरिकन कॉलनीजमध्ये पोहचला आणि त्याचा उच्चार केचअप असा होऊ लागला. अंडय़ाचा पांढरा भाग, मश्रूम, कालवं, अक्रोड यांचे केचअप आवडीने खाल्लं जातं. जे पदार्थ विशिष्ट मोसमात मोठय़ा प्रमाणात मिळतात, त्याचे सॉस वा केचअप बनवण्याची पद्धत त्या काळात रूढ होती. आपल्याकडे जसं गाजराच्या, आवळ्याच्या, कैरीच्या मोसमात आपण ते पदार्थ वेगवेगळ्या रूपात साठवतो, अगदी तसाच हा प्रकार असायचा.

हेही वाचा : ‘द व्हॅक्सिन वॉर’मधील ‘तो’ श्लोक आणि सृष्टिनिर्मितीचे रहस्य…

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
mahabaleshwar strawberries will reach every household through post with special stamp
स्ट्रॉबेरी आता सचित्र टपाल शिक्क्यावर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
pizza advertisment banned
पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?
Cucumber, flower, brinjal, carrot,
पुणे : काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर स्वस्त


भारतीय खवय्यांसाठी सॉस आणि केचअप दोन्ही सारखेच असले तरी या दोघांत सूक्ष्म भेद आहे आणि जगभरातील बल्लवाचार्य तो महत्त्वाचाही मानतात. केचअपमध्ये मसाले, व्हिनेगर अनिवार्य असतं. तर सॉसमध्ये ते जवळपास वापरलं जात नाही. शेफच्या दृष्टीने विचार केला तर केचअप हा अधिकतर पदार्थावरील ड्रेसिंगचा, सजावटीचा प्रकार आहे.

टोमॅटो सॉस म्हणजे काय?

सॉस बनविण्यासाठी वेगवेगळे मसाले आणि टोमॅटोच्या रसासोबतच वेगवेगळे पदार्थ लागतात. सॉस हा असा पदार्थ आहे जो अन्य पदार्थांमध्ये किंवा मसाल्यांवर टाकला जातो. जेणेकरून त्या पदार्थाची, मसाल्याची चव आणखी चवदार होते. सॉसमध्ये आलं-लसूण यांचाही वापर करण्यात येतो. सॉस हा थोडा तिखट-मसालेदार लागण्याची शक्यता असते.

हेही वाचा : रात्री जागणाऱ्यांना होऊ शकतो ‘टाईप २’ मधुमेह; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

केचअप म्हणजे काय?

टोमॅटोच्या गरामध्ये व्हिनेगर, साखर, अल्प प्रमाणात मसाले वापरले जातात. यामध्ये लसूण-आलं यांचा समावेश नसतो. पारंपरिक लाल-हिरवी मिरची वापरली जाते. केचअप हे कोणत्याही पदार्थांमध्ये ऍड करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही पदार्थाची चव वाढत नाही.

टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअप यातले फरक

टोमॅटो सॉसमध्ये साखर नसते. याउलट केचअपमध्ये साखर आणि इतर गोड पदार्थही असतात. टोमॅटो साॅसच आधुनिक रूप आणि लहान मुलांनाही खाता येईल असे रूप म्हणून केचअप कडे पाहिले जाते. सॉस हा विविध प्रकारे बनवता येतो. पण, केचअपची एकच रेसिपी आहे. सॉस हा समोसा, किंवा अन्य तळलेल्या पदार्थांसह छान लागतो. केचअप चायनीज-फास्टफूड सोबत छान लागते.

Story img Loader