जे लोक मद्यपानाचे शौकीन आहेत, ते मद्यपान करण्यासाठी ‘बार’ आणि कधी कधी पब मध्ये जातात. तुम्हीही तुमच्या शहरातील पब, बार वगैरेचे बोर्डही पाहिले असतील किंवा तुम्ही बार, पबमध्येही गेला असाल. बरेच लोक बार किंवा पबमध्ये जातात, परंतु त्यांना त्याचा अर्थ माहित नाही. पब, बार, क्लब ही सर्व गेट-टूगेदर ठिकाणे एकमेकांपासून किती वेगळी आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण पब बार किंवा क्लब यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे आणि तेथील सेवा कशी वेगळी आहे हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बार म्हणजे काय?

जर आपण बारबद्दल बोललो, तर बार ही अशी जागा आहे, जिथे दारू विकण्याची परवानगी आहे. म्हणजेच त्या ठिकाणी दारू दिली जाऊ शकते आणि तिथे बसून दारू प्यायली जाऊ शकते. बारला दारू विकण्यासाठी विशेष परवानगी लागते आणि परवाना मिळाल्यानंतरच येथे दारू दिली जाऊ शकते. बारमध्ये तुम्ही टेबलवर बसता, जिथे बारटेंडर किंवा वेटर तुम्हाला तुमच्या मागणीनुसार दारू, सिगारेट पाठवतात. तसेच इथे खाण्याचे वेगवेगळे पदार्थही मिळतात.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

पब म्हणजे काय?

पबबद्दल बोलायचं झालं, तर पब हे सार्वजनिक ठिकाण आहे, जिथे मद्यपान केले जाते. बारमध्ये जसे काही टेबल असतात आणि ठराविक ठिकाणी बसूनच दारू प्यावी लागते, तसे पबमध्ये होत नाही. तथापि, पबमधील वातावरण अगदी वेगळे असते आणि तेथे काही अ‍ॅक्टिव्हिटीज चालू असू शकतात. तुम्ही थोडं डान्स वगैरे देखील करू शकता आणि तिथे तुम्हाला काही कलाकारांचे डान्स वगैरे बघायला मिळतात. याशिवाय अनेक प्रकारचे उपक्रमही येथे केले जातात.

क्लब म्हणजे काय?

क्लब म्हणजे असे ठिकाण जिथे भरपूर जागा असते आणि तिथे डान्स फ्लोअर किंवा डान्स स्टेज असते. तुम्ही येथे ड्रिंक ऑर्डर करू शकता किंवा काउंटरवर जाऊन तुम्ही ते स्वतः घेऊ शकता. येथे जाण्यासाठी प्रवेश शुल्क भरावे लागते. याशिवाय येथे मेंबरशिपही घेता येते. लोक दीर्घकाळ आनंद घेण्यासाठी मेंबरशिपला प्राधान्य देतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the exact difference between bar pub and club know the variance between them pvp