कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये शोभून दिसणारी इवल्याशी टिकली वादास कारण बनल्यामुळे चर्चेत आहे. आजकाल फॅशन म्हणून लावली जाणारी टिकली सण-समारंभाच्या वेळेस स्त्रियांचे सौंदर्य आणखीन खुलवते. पूर्वी टिकलीऐवजी कपाळावर महिला कुंकू लावायच्या. महिलांच्या प्रत्येक दागिन्याचं काही ना काही महत्त्व आहे. तसंच कुंकू आणि टिकली लावण्याचंही आहे.
कोणाला टिकली लावायला आवडते तर कोणाला नाही. टिकली लावायची की नाही हा प्रत्येक महिलाचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन डोळ्यांच्या मध्ये जिथे टिकली लावली जाते तिथे अॅक्युप्रेशर पॉइंट असतो. त्यामुळे टिकली लावण्याचे अनेक फायदे आहेत.
टिकली लावण्याचे आश्चर्यकारक फायदे
डोकेदुखी कमी होते
टिकली किंवा कुंकू लावल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो. दोन भुवयांच्या मध्ये अॅक्युप्रेशर पॉइंटवर दाब दिल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. त्यामुळे टिकली लावल्यामुळे डोकेदुखीच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते.
सायनसचा त्रास कमी होतो
डोळ्यांच्या मधून एक नस जाते. ज्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरील संवेदना जाणवतात. त्यामुळे कपाळावर टिकली लावल्यास सायनसचा त्रास कमी होतो.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
कपाळाच्या मध्यभागातूनच डोळ्यांना जोडणाऱ्या धमन्याही जात असतात. त्यामुळे टिकली लावल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. तसेच दृश्यमानतेवरही याचा सकारात्मक परिणाम होतो.
तरुण दिसण्यास मदत
कपाळावर टिकली लावल्याने चेहऱ्याच्या शीरा मजबूत होतात. परिणामी चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावरील तारुण्य कायम राहते.
नैराश्य येत नाही
आजकाल बऱ्याच जणांना मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवतात. रोज थोडा वेळ दोन भुवयांच्या मध्ये बोटाने दाब दिल्यास नैराश्यापासून आराम मिळू शकतो. त्यामुळे कपाळावर टिकली किंवा कुंकू लावणाने नैराश्याचा सामना करण्यासही मदत होते.
श्रवणशक्ती सुधारते
दोन भुवयांच्या मधून जाणारी एक नस थेट कानापर्यंत जोडली गेलेली आहे. त्यामुळे श्रवणशक्तीवरही त्याचा परिणाम होते. टिकली लावल्यास श्रवणशक्ती सुधारते.
ताण-तणाव कमी होतो
बालासन या योगप्रकारात कपाळ जमिनीला टेकवले जाते. तणाव कमी करण्यासाठी हा योगप्रकार केला जातो. यामध्ये कपाळवरील मध्यभागी दाब निर्माण होऊन ताण कमी होण्यास मदत होते. टिकली लावल्यानेही या भागावर दाब निर्माण होत असल्याने ताण-तणाव कमी होतो.
स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर सकारात्मक परिणाम
कपाळाच्या मध्यभागी अॅक्युप्रेशर पॉइंट असल्याने या भागावर दाब दिल्यास त्याचा स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे टिकली लावल्याने स्मरणशक्ती वाढण्यासोबतच एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे सोपे जाते.