उभं राहून पाणी पिऊ नये असं तुम्ही अनेकदा मोठ्यांच्या तोंडून ऐकलं असेल, पण आपण ते ऐकणं टाळतो. अनेकवेळा वेळेच्या कमतरतेमुळे आपण बसून पाणी पिऊ शकत नाही, म्हणून घाई-घाईमध्ये आपण उभ्यानेच पाणी पितो. पण अशा प्रकारे पाणी पिणे खरोखरच आपले शारीरिक नुकसान करू शकते. या गोष्टीमागे एक वैज्ञानिक कारण आहे.
उभे राहून पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर दाब पडतो. पोटात पाणी लवकर पोहोचते. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. आपल्या आयुर्वेदातही उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. डॉक्टरही खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.
बसून पाणी का प्यावे?
पाणी पिण्यासाठी बसलेली स्थिती उत्तम आहे. त्यामुळे पाण्याचे पचन व्यवस्थित होते. जेव्हा एखादी व्यक्ती बसून पाणी पिते तेव्हा ते आपल्या पेशींमध्ये नीट पोहोचते. पाणी पेशींपर्यंत जाऊन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्याचे योग्य शोषण झाल्यामुळे रक्त शुद्ध होऊन शरीर निरोगी राहते.
Health Tips : ‘या’ गोष्टी खाल्ल्यावर येऊ शकतो राग; तापट माणसांनी अजिबात करू नये सेवन
उभं राहून पाणी का पिऊ नये?
उभे राहून पाणी पिऊ नये. चुकीच्या पद्धतीने किंवा उभं राहून पाणी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात.
- मूत्रपिंड निकामी होणे
उभे राहून पाणी पिणे आपल्या किडनीसाठी हानिकारक आहे, कारण अशा स्थितीत रक्त पेशींपर्यंत पाणी योग्य प्रकारे पोहोचत नाही आणि रक्तामध्ये अशुद्धता वाढते. किडनी रक्तातील खराब पदार्थ आणि अशुद्धता काढून मूत्र तयार करते. हा कचरा जास्त असल्यास किडनीचे कार्य वाढते. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या वाढू शकतात.
- खराब पचन
उभे राहून पाणी प्यायल्याने पचनसंस्था खराब होते. यामुळे अन्ननलिकेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. अॅसिडिटी आणि अपचनाची समस्या होऊ शकते. बसून पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)