श्रावण महिन्याला हिंदी धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे. या महिन्यातच भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. तेव्हा महादेव या सृष्टीचे चक्र चालवतात. असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याला महत्त्व असून हा काळ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. त्यातही श्रावणातील सोमवार अधिक महत्त्वपूर्ण मानला गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रावण महिन्याचे महत्व

संपूर्ण वर्षभर, सोमवार हे भगवान शिव यांना समर्पित केले जातात. परंतु, श्रावण महिन्यातील सोमवार व्रताचे विशेष महत्त्व आहे. भगवान शंकर आणि चंद्र देवाशी संबंधित एक आख्यायिका आहे, जी सोमवारी भगवान शिवाची पूजा का महत्त्वपूर्ण आहे हे स्पष्ट करते. असे मानले जाते की जे व्रत पाळतात आणि सोमवारी भगवान शंकराची मनापासून पूजा करतात, त्यांना सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते.

कधी आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार? जाणून घ्या उपासनेची योग्य विधी

पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनात देव आणि दानव सहभागी झाले तेव्हा त्यांनी विषाने भरलेले भांडे काढले. या देव आणि दानवांना अमृत मिळावे यासाठी भगवान शंकराने संपूर्ण विष पिऊन टाकले आणि विश्वाचे रक्षण केले. देवी पार्वतीने शंकराची मान घट्ट धरून ठेवली होती. जेणेकरून हे विष त्यांच्या शरीरात विष प्रवेश करू नये. यामुळेच शंकराची मान (नीळकंठ) निळी झाली. कृतज्ञतेचे चिन्ह म्हणून, लोक भगवान शिवाला गंगाजल अर्पण करतात. असे मानले जाते की अविवाहित मुलींनी सलग १६ सोमवार व्रत ठेवल्याने त्यांना त्यांच्या आवडीचा वर मिळू शकतो.

श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत ठेवण्याचे फायदे :

  • योग्य खाणे आणि नियमित पातळीवर आपले शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. यासाठी उपवास हे सर्वोत्तम तंत्रांपैकी एक आहे.
  • तपश्चर्या आणि तपस्या करून, व्यक्ती आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करू शकते.
  • असे मानले जाते की श्रावण महिन्यात व्रत केल्याने अविवाहितांना त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळू शकतो.
  • असेही मानले जाते की भगवान शिव आणि देवी पार्वती विवाहित जोडप्याला आशीर्वाद देतात आणि जर त्यांच्यात काही वैवाहिक विवाद असतील तर तेही सोडवतात.

Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

व्रतासाठी सकस भोजन योजना

  • सकाळी लवकर: एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू मिसळून प्या. हे शरीराला हायड्रेट करेल आणि आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करायला मदत करेल.
  • न्याहारी: एक ग्लास कोमट दुधासह पौष्टिक फळांनी भरलेली वाटी. हे तुमच्या शरीराला ऊर्जा देईल आणि आवश्यक फायबर प्रदान करेल.
  • नाश्ता: न्याहारीच्या २ तासांनंतर बदाम आणि अक्रोड सारखे काही ड्रायफ्रूट्स खा. हे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करेल.
  • दुपारचे जेवण: एक वाटी सलाड आणि साबुदाणा खिचडी घ्या. मिठाला पर्याय म्हणून तुम्ही काळी मिरी आणि हिरवी मिरची घालू शकता.
  • संध्याकाळचा नाश्ता: संध्याकाळी तुम्ही एक कप चहा किंवा कॉफी घेऊ शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
  • रात्रीचे जेवण: चपाती, सूप, दही आणि एक वाटी डाळ असलेले पौष्टिक जेवण जेवा.
  • रात्रीच्या जेवणानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही कोणत्याही हंगामी फळांसह एक ग्लास कोमट दूध घेऊ शकता.
  • व्रताच्या वेळी तळलेले अन्न टाळा आणि साखरयुक्त रसाचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवा.

यावर्षी श्रावण महिना २९ जुलैपासून सुरु होईल आणि २७ ऑगस्टला समाप्त होईल. दरम्यान १ तारखेला श्रावणातील पहिला सोमवार असून दुसरा श्रावणी सोमवार ८ ऑगस्ट, तिसरा १५ ऑगस्ट, आणि चौथा श्रावणी सोमवार २२ ऑगस्टला असेल. या चार श्रावण सोमवारी उपवास ठेवण्यात येतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the right way to fast on shravan monday know healthy diet plan for fasting pvp