आपण अनेकदा पाहिले असेल की बरेचजण आपले घर, दुकान आणि गाडीमध्ये लिंबू मिरची लटकवतात. काहीजण याला अंधश्रद्धा मानत असले तरीही अनेकजणांची यावर पूर्ण श्रद्धा असते. ते असे मानतात की घर, दुकान आणि कारमध्ये लिंबू-मिरची लटकवल्याने शरीर निरोगी राहते. काही लोक त्यांच्या विकासासाठी आणि विविध प्रकारच्या त्रासांपासून दूर राहण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की लिंबू-मिरची लटकवल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. त्याचबरोबर काही लोक वास्तूदोष दूर करण्यासाठीही लिंबू आणि मिरचीचा वापर करतात. आज आपण जाणून घेऊया लिंबू-मिरची लटकवण्यामागची रंजक कारणे.
दृष्ट लागण्यापासून वाचवते :
असे मानले जाते की लिंबू-मिरची लटकवल्याने वाईट नजरा दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार, लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरांचा प्रभाव कमी करण्यास उपयुक्त आहे.
वास्तुशास्त्रानुसार ‘या’ झाडांचे घरातील अस्तित्व ठरू शकते दुर्भाग्य आणि आर्थिक समस्येचे कारण
लिंबू-मिरची लटकवण्यामागील विज्ञान :
काही लोक असे मानतात की दारावर लिंबू-मिरची लटकवण्यामागेही एक शास्त्र आहे. वास्तविक, जेव्हा आपण मिरची, लिंबू यांसारख्या गोष्टी डोळ्यांसमोर पाहतो तेव्हा आपल्याला मनात त्याची चव जाणवू लागते. यामुळे आपण ते जास्त वेळ पाहू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून काढून घेतो. त्यामुळे आपल्याला आपल्या कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. विज्ञानानुसार कोणतीही स्वादिष्ट वस्तू पाहिल्यानंतर मेंदूच्या पेशी चांगल्या प्रकारे काम करू लागतात आणि मनात सकारात्मकतेचा संचार होतो. आपण चांगले विचार आणि चांगले काम करतो. सोबतच, आपले लक्ष देखील योग्य ठिकाणी राहते.
आरोग्य चांगले राहते :
आरोग्याच्या दृष्टीकोनातून लिंबू आणि मिरची आरोग्यासाठी खूप चांगली आहे. दोन्हीमध्ये व्हिटॅमिन-सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आपण व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहतो. याशिवाय, लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते. जेव्हा ते दारावर लटकवले जाते तेव्हा त्यांच्या उग्र वासामुळे डास, माश्या आणि बरेच कीटक घरात आणि दुकानात प्रवेश करू शकत नाहीत. हे पर्यावरण शुद्ध करते आणि लोकांच्या आरोग्याचे रक्षण करते.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)