तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने जेवणाची चव वाढते तसेच शरीराला पोषक तत्त्वेही मिळतात. तुपाचे सेवन आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच केसांसाठीही फायदेशीर ठरते. केसांवर याचा वापर केल्याने केसांना पोषण मिळते आणि केसांच्या समस्याही दूर होतात. तुपात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया आणि बुरशीपासून टाळूचे संरक्षण करतात. असे उपयुक्त तूप वापरल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया केसांना तूप लावल्याने कोणते फायदे होतात.
कोंड्यावर उपचार करते :
केसांना तूप लावून कोंडा दूर होतो. तूप मलासेझिया फर्फर नावाच्या बुरशीची वाढ थांबवू शकते. मालासेझिया फर्फर बुरशी हे कोंडा होण्याचे मुख्य कारण मानले जाते. तुपात बॅक्टेरिया आणि बुरशीविरोधी दोन्ही गुणधर्म असतात, ज्यामुळे ते केसांना कोंडा होण्यापासून वाचवते.
Photos : गरापासून ते साल आणि बियांपर्यंत आहे आरोग्यदायक; जाणून घ्या कलिंगडाचे ‘हे’ १५ फायदे
केस मऊ करते :
केसांना तूप लावल्याने केस मुलायम आणि निरोगी होतात. फॅटी अॅसिडने भरपूर असलेले तूप केसांना पोषण देण्यासोबतच केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवते.
केस गळणे थांबवते :
केसांमध्ये पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळायला सुरुवात होते. केसगळती रोखण्यासाठी तुपाचा वापर खूप गुणकारी आहे. तुपातील पोषक घटक केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात.
दातांच्या पिवळेपणामुळे हैराण आहात? ‘या’ ५ घरगुती उपायांनी मिळेल सुटका
केस पांढरे होण्यापासून वाचवते :
खाण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम केसांवरही दिसून येतो, केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळतात. जर तुम्हाला पांढऱ्या केसांचा त्रास होत असेल तर केसांना तूप लावा. तूप लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस पांढरे होणे थांबते.
केसांचा कोरडेपणा दूर करते :
केसांना तूप लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि गुंतलेले केस सोडवणे सोपे होते. तूप केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवते आणि केसांचा कोरडेपणा दूर करते.
(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)