जेव्हा आपली नखं आणि केस वाढतात तेव्हा आपल्याला ते कापावे लागतात. आपण जेव्हा आपली नखं किंवा केस कापतो तेव्हा आपल्याला अजिबात वेदना होत नाहीत. शरीराच्या इतर भागांना किरकोळ जखम झाली तरी वेदना जाणवू लागतात. मात्र नखं आणि केस शरीराचा भाग असूनही ते कापल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वेदना जाणवत नाहीत. यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहित आहे का? आज आपण हे कारण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपली नखं मृत पेशींनी बनलेली असल्यामुळे त्यांना कापताना काहीच त्रास होत नाही. नखं ही आपल्या शरीरातील एक विशेष रचना आहे जी त्वचेपासून जन्माला येते. ते केरेटिन नावाच्या पदार्थापासून बनलेले असतात. केरेटिन हा निर्जीव प्रथिनांचा एक प्रकार आहे.

फ्रिज स्वच्छ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? वापरून पाहा ‘या’ सोप्या टिप्स

नखांना बोटांच्या त्वचेच्या आत आधार असतो. नखाखालची त्वचा शरीराच्या इतर भागासारखी असते. पण त्यात लवचिक तंतू असतात. हे तंतू नखांना चिकटलेले असतात आणि ते नखं घट्ट धरून ठेवतात. नखं सहसा जाड असतात. पण त्यांची त्वचेखालील मुळे अतिशय पातळ असतात. मुळाजवळील भागाचा रंग पांढरा असून त्याचा आकार अर्धचंद्र किंवा अर्धवर्तुळासारखा असतो. बोटांची नखं दरवर्षी सुमारे दोन इंच वाढतात.

नखं आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. ते आपल्याला गोष्टी निवडण्यात आणि कलात्मक काम करण्यात मदत करतात. ते आपल्या बोटांच्या टोकांचे रक्षण करतात. महिलांसाठी नखं, त्यांच्या सौंदर्याशी देखील संबंधित आहेत. विविध रंगांचे पॉलिश लावून ते नखं सजवतात. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून नखं वाढवण्याचा ट्रेंडही वाढला आहे. मात्र नखांची रचना नाजूक आहे. काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नखांमध्ये दोष निर्माण होतात. या दोषांमुळे नखे फुटतात किंवा तडकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why nail cutting does not cause pain find out the reason behind this pvp