Why Do You Soak Onions: उन्हाळ्यामध्ये कच्चा कांदा भरपूर प्रमाणात खातातते. कांदा फक्त शरीराला थंडवा देत नाही पण त्यात कित्येक अँन्टी ऑक्सिडेंट्स आणि इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. कांद्याचे फायदे सर्वांनाच माहित आहेत. कांद्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो मग ग्रेव्ही असो किंवा सॅलडसाठी. कांद्याशिवाय कित्येक पदार्थ तयार करता येत नाही. कांदा खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तुम्ही पाहिले असेल की कांदा कापल्यानंतर थंड पाण्यामध्ये भिजवितात. पण तुम्हाला असे करण्यामागील कारण माहित आहे का?
कांदा कापल्यानंतर पाण्यात का ठेवतात?
कित्येक लोक कांद्याच्या तिखटपणामुळे तो खात नाही. कांदा चवीला तिखट असतो आणि कांदा खाल्यानंतर बराच वेळ तोंडाला त्याचा वास येतो. जर तुम्ही तुमचे ग्रिल्ड बर्गर आणि सॅलडचे स्वरुपामध्ये कच्चा कांदा खाणे आवडत असेल पण त्याच्या तिखटपणामुळे किंवा वासामुळे तुम्ही खाणे टाळत असाल तर आमच्याकडे एक सोपा उपाय आहे जो तुम्हाला उपयोगी ठरेल.
तुम्हाला फक्त इतके करायचे आहे की कांदा ताटात वाढण्यापूर्वी एक वाटी पाण्यात चांगला भिजू द्या. यामुळे कांद्यांचा तिखटपणा कमी होतो. कांद्याच्या तिखटपणामागे सल्फर संयुगे कारणीभूत असतात.
कित्येक लोक पोट साफ करण्यासाठी देखील काद्यांचे सेवन करतात. तसेच, कांद्याच्या सेवनामुळे केसांची गळती कमी होऊन लांब केस वाढू शकतात.
फक्त कांद्याचे साल काढून कापून घ्या. मग थंड किंवा बर्फाच्या पाण्यामध्ये कांदा भिजण्यासाठी ठेवा. कमीत कमीत १० मिनिट कांदा तसाच राहू द्या नंतर पाण्यातून बाहेर काढा. थंड पाणी काद्याचा तिखटपणा कमी करतो. चवीसाठी तुम्ही कांद्याला लिंबाचा रसामध्ये देखील भिजूव शकता. ही सर्व प्रक्रिया कारल्यासाठी देखील उपयोगी ठरते.