Relationship Tips : प्रत्येकाला वाटतं की त्यांच्या जोडीदाराबरोबर त्यांचे नाते खूप चांगले, आनंदी दीर्घकाळ टिकणारे असावेत.कोणत्याही नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा असणे खूप जास्त गरजेचे आहे. जोडीदाराबरोबर चांगले नाते निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतात पण अनेकदा खूप प्रयत्न करुनही काहीही फायदा होत नाही. अशावेळी काय करावे, काही सुचत नाही. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

सायकॉलॉजिस्ट डॅनिअल जी अमेन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहेत. ते या व्हिडीओमध्ये सांगतात, “तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी काय आवडत नाही यापेक्षा जोडीदाराविषयी काय आवडते, यावर लक्ष केंद्रित करा.”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Budh Shani Kendra Drishti
१२ नोव्हेंबरपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन

आपल्याला जोडीदाराविषयी काय आवडते किंवा आपण त्यांच्या कोणत्या गोष्टींचे कौतुक करतो, हे महत्वाचे आहे पण याशिवाय आपली वागणूक आणि सवयी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात यामुळे आपले नाते अधिक सुधारतात. याविषयी जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल सान्ससेस येथील डॉक्टरल रिसर्च फेलो इरफान फयाज ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगतात, “कोणत्याही नात्यात जेव्हा जोडीदार भावनिक, शारीरिक, आणि मानसिक दृष्ट्या सहकार्य करतो आणि खुल्या विचारांनी आणि प्रामाणिकपणे संवाद साधतो, विश्वास ठेवतो, आदर करतो, एकमेकांचे कौतुक करतो, सहानुभूती व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांचे महत्व समजून घेतो, तेव्हा ते नातेसंबध चांगले असते.”

हेही वाचा : कोरफडीसोबत ‘हे’ पदार्थ मिसळून बनवा घरगुती तेल, केसांची गळती कमी होऊन दाटपणा वाढेल; पाहा ही रेसिपी

चांगले नातेसंबंध टिकवण्यासाठी खालील टिप्स जाणून घ्या

  • कोणत्याही नात्यात जोडीदाराला वेळ देणे खूप जास्त गरजेचे आहे. एकमेकांसाठी वेळ काढा. एकमेकांना पुरेसा वेळ द्या. यामुळे तुम्हाला एकमेकांबरोबर संवाद साधता येईल.
  • जोडीदाराचे नेहमी कौतुक करा. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे कौतुक करता किंवा कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा नाते अधिक दृढ होते. यासाठी तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणू शकता किंवा ‘आय लव्ह यू’म्हणत प्रेम व्यक्त करू शकता.
  • कोणत्याही नात्यात संवाद खूप गरजेचा आहे. त्यामुळे नियमित जोडीदाराबरोबर बोला आणि त्यांच्याबरोबर संवाद साधा. यामुळे एकमेकांचे विचार, भावना आणि गरजा समजून घेणे सोपी जाते.
  • नात्यात प्रत्येक गोष्टीत समतोल राखणे खूप जास्त गरजेचे आहे.जर तुमचा जोडीदार बोलत असेल तर त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • नात्यात प्रेम व्यक्त करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे क्षणोक्षणी प्रेम व्यक्त करायला विसरू नका.