Long Nails Disadvantages: लांब नखे ठेवायला प्रत्येक मुलीला आवडतात. वाढलेली नखे मुलींचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. पण तुम्हाला माहित आहे का की या नखांची नीट काळजी घेतली नाही तर त्यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. एका संशोधनानुसार, असे निदर्शनास आले आहे की, व्यक्तीच्या लांब नखांमध्ये ३२ पेक्षा जास्त जीवाणू आणि बुरशीच्या २८ पेक्षा जास्त प्रजाती असू शकतात. त्यामुळे, जर तुमची नखे लांब असतील, तर त्यांची वेळोवेळी स्वच्छता करत राहणे गरजेचे आहे. तर जाणून घ्या लांब नखांमुळे होणाऱ्या समस्या.
संसर्ग होऊ शकतो
जर तुमची नखे लांब असतील आणि तुम्ही त्यांची साफसफाई करण्याकडे लक्ष दिले नाही तर त्यामुळे खूप वाईट संसर्ग होऊ शकतो. लांब नखांमुळे पिनवर्म्स होऊ शकतात. पिनवर्म हे पांढरे आणि सडपातळ किडे असतात जे एक इंच पेक्षा कमी आकाराचे असतात. जे नखांद्वारे पोटात जाऊन तुमच्या आरोग्याचे नुकसान करण्याचे काम करतात.
( हे ही वाचा: Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर, जाणून घ्या)
उलट्या आणि अतिसार
जर तुमची नखे लांब असतील तर त्यात साठलेले बॅक्टेरिया स्वयंपाक करताना किंवा काहीही खाताना पोटात पोहोचतात. याशिवाय अनेकांना नखे चावण्याचीही सवय असते, त्यामुळे हे घाणेरडे बॅक्टेरियाही पोटात जातात. त्यामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
प्रतिकारशक्तीवर परिणाम
रोगप्रतिकारक यंत्रणेचे कार्य जीवाणू आणि विषाणूंशी लढणे आहे. जर तुम्ही तुमची लांब नखे रोज स्वच्छ ठेवली नाहीत, तर नखांच्या आत साठलेले बॅक्टेरिया, जंतू पुन्हा पुन्हा संक्रमित होत राहतात आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते.
( हे ही वाचा: स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेसाठी ‘या’ सुपरफूडचा आहारात समावेश करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे)
गर्भावस्थेतही धोकादायक
गर्भधारणेदरम्यान हार्मोन्समधील बदलांमुळे, नखे खूप वेगाने वाढतात आणि त्याच वेळी कमकुवत देखील होतात. त्यामुळे नखांमध्ये असलेल्या घाणीमुळे जर काही प्रकारचे जिवाणू संसर्ग झाला असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत नखे वाढवणे सहसा टाळा. जर वाढवत असाल, तर त्यांची नीट काळजी घ्या.