ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुधारावे आणि आजारी पडल्यास तात्काळ उपचार व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी ‘प्राथमिक आरोग्य केंद्रां’ची निर्मिती करण्यात आली. देशभरातील अनेक दुर्गम भागांत प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली. मात्र देशभरातील आठ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ‘ग्रामीण आरोग्य आकडेवारी : २०१४-१५’ प्रसिद्ध केली आहे. ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याचे चित्र हे आकडेवारी दाखविते. देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल ६७.६ टक्के पदे रिक्त असून, ती त्वरित भरणे गरजेचे आहे, याकडे ही आकडेवारी लक्ष वेधते. देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ७४.६ टक्के शल्यचिकित्सक, ६५.४ टक्के प्रसूतीतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांची पदे रिक्त आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. २०१५ मध्ये २७,४२१ डॉक्टर झाले. महाराष्ट्र (४३१), राजस्थान (३०१), तामिळनाडू (२३६), हरयाणा (९४) या राज्यांमध्ये डॉक्टरांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’ देशभरातील आठ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध नाही’ २१.९ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येऔषधविक्रेते नाहीत.
’ ३५ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रयोगशाळातंत्रज्ञ नाहीत.प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे’ शल्यचिकित्सक :
७४.६ टक्के ’ प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ : ६५.४ टक्के ’ चिकित्सक : ६८.१० टक्के’ बालरोगतज्ज्ञ : ६२.८० टक्केएकूण : ६७.६०
(आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेस्थळावरून)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors not available in remote area