पांढरे डागाच्या समस्येबाबत (vitiligo leucoderma) लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज पसरवले जातात. या समस्येबाबतच्या अनेक अनेक अफवा तुमच्याही ऐकण्यात आल्या असतील. शिवाय तुम्ही तुमच्या आसपास असे अनेक लोक पाहिले असतील, ज्यांच्या त्वचेवर पांढरे डाग असतात. तर ही समस्या कशी उद्भवते याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पांढऱ्या डागांची समस्या अचानक उद्भवत नाही तर ती समस्या सुरु होण्याच्या काही लक्षणं दिसून येतात. याशिवाय लोकांमध्ये असा एक समज आहे की, चिकन, मासे किंवा वांगी खाल्ल्यानंतर दुध पिल्याने हा आजार होतो. लोकांच्या या बोलण्यात किती तथ्य आहे ते आज समजून घेऊया.
पांढर्या डागांबाबतचे काही समज –
हेही वाचा- सतत मांसाहार खाल्ल्याने तुम्हालाही होऊ शकतात ‘हे’ भयंकर आजार; वेळीच जाणून घ्या
मासे, कोंबडी किंवा वांगी खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केल्यामुळे पांढके डाग शरीरावर येतात अशी भीती अनेकांच्या मनात असते. मात्र, या पदार्थांचे सेवन करुन दुध पिल्याने ही समस्या उद्धभवते, याबाबतचे अद्याप कोणतेही वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाहीत. अनेक लोक हे डाग घालवण्यासाठी कडुलिंब किंवा गोमूत्राचा वापर करतात. मात्र, हा आजार शरीराच्या आतील भागाला रंग देणाऱ्या पेशींमुळे होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण शरीराला वरून काही लावल्याने ही समस्या बरी होऊ शकत नाही.
त्वचारोगाची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या –
हेही वाचा- तुमचेही केस भरपूर प्रमाणात गळतायत का? तज्ञांकडून जाणून घ्या ‘या’ समस्येवर घरगुती उपाय
सुरुवातीच्या टप्प्यात त्वचेचा रंग जागोजागी फिका पडू लागतो. याची सुरुवात सर्वात आधी ओठ, हात, पाय आणि चेहऱ्यावर सुरु होते. याचा अर्थ आपल्या शरीराच्या ज्या भागात थेट सूर्यप्रकाश पडतो त्या ठिकाणी सुरुवात होते. या लक्षणांसह केस कोरडे पडणे, दाढी आणि भुवयांवरील रंग उडणे ही देखील या आजाराच्या सुरुवातीची लक्षणे मानली जातात. तसंच डोळ्यातील रेटिनाच्या थराचा रंगही फिका पडतो. वैद्यकशास्त्रानुसार पांढरे डाग हा आजार झाला तर तो किती प्रमाणात वाढू शकतो हे सांगणे कठीण आहे. मात्र, या आजारावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास नवीन डाग तयार होण्यास रोखता येऊ शकते.
(टीप: वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित असून गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)