एखादा पदार्थ खाताना, विशेषतः सँडविच, बिर्याणी यांसोबत बरेचदा आपण सॉफ्ट ड्रिंक किंवा सोडा असणारी पेये अगदी सहज पीत असतो. खाताना घास घशात / अन्ननलिकेत अडकला की, पाण्याऐवजी पटकन सोडायुक्त पेयाचा एक घोट घेतला जातो. सोड्यामुळे घशात अडकलेले अन्नकण पटकन निघून जातात, असा आपला समज असतो. तुम्हालादेखील जेवणासोबत असे पेय पिण्याची सवय असेल, तर ती मुळीच चांगली नाहीये. त्यामुळे वेळीच ही सवय सोडणे चांगले, असे एका अभ्यासामध्ये सांगितले गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बऱ्याचदा जेवताना घास घशात / अन्ननलिकेत अडकल्यास सोड्याचा वापर केला जातो. असे असले तरीही नुकतेच अॅमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर्सच्या (यूएमसी) [Amsterdam University Medical Centers (UMC)] काही संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून असे समजते की, जेवताना अन्ननलिकेत / घशात काही अडकल्यास सोडा पिण्याने आराम मिळतो हे एक मिथ (myth) आहे. ब्रिटिश मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे समजते की, घशात अडकलेले घास अन्ननलिकेतून सहज खाली घालवण्यासाठी सोड्याचा खरेच फायदा होतो, असे दाखवून देणारा कोणताही ठोस पुरावा नाही.

हेही वाचा : अरेच्चा! हे चक्क बिना अंड्याची, अंडा भुर्जी विकतात? चकित झालात ना? मग हा व्हिडीओ पाहा

जेवणादरम्यान सॉफ्ट ड्रिंक का प्यायले जाते?

पूर्वी एकदा एका आफ्रिकन जर्नल ऑफ इमर्जन्सी मेडिसिनच्या [African Journal of Emergency Medicine] एका जर्नलमध्ये कार्बोनेटेड पेय पिण्याने घशातील / अन्ननलिकेत अडकलेली गोष्ट पटकन गिळण्यास मदत होते, असे म्हटले जाते आणि डॉक्टरांचादेखील त्यावर विश्वास असल्याचे समोर येते. सोड्यामधील असलेल्या कार्बन डाय-ऑक्साइड गॅसच्या मदतीने अन्ननलिका जलद गतीने साफ होऊ शकते, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे नंतर याला ‘कोला ट्रिक’ म्हणूनसुद्धा ओळखले जायचे, असे एनडीटीव्हीच्या [NDTV] एका लेखावरून समजते.

घास घशात अडकल्यानंतर सोडा खरेच मदत करतो का?

कोणताही पदार्थ खाताना एखादा घास किंवा काही कण अन्ननलिकेत अडकल्यास त्याचा त्रास होतो. कधी कधी ते जीवावरदेखील बेतू शकते. त्यामुळे ‘कोला ट्रिक’ म्हणजेच सोडा खरेच यामध्ये काही मदत करतो का, यावर संशोधकांनी अभ्यास केला.

त्यासाठी पाच डच हॉस्पिटलमधील ५१ रुग्णांवर हा प्रयोग करून पाहिला गेला. त्यामध्ये एण्डोस्कोपी करताना काहींना सोडा देण्यात आला; तर काहींना नाही. प्रयोगाचा निकाल अगदी स्पष्ट होता. अन्न घशामध्ये / अन्ननलिकेत अडकल्यास सोडा कोणतीही मदत करीत नाही. म्हणजे याचाच अर्थ सोडा न पिताही आपोआप अन्ननलिकेमधील अन्नकण निघून गेले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does drinking soda really helps you to clear your throat watch what study have to say dha
Show comments