बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांचे प्रमाण वाढले आहे. शरीर निरोगी राहावे यासाठी योग्य आणि पुरेपूर आहार घेणे गरजेचे असते. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळं अशा शरीराला सुदृढ बनवण्यासाठी मदत करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. बहुतांश वेळा जंक फुड किंवा तेलकट पदार्थांचा समावेश असणाऱ्या जेवणामध्ये सॅलेडचा समावेश करून समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. सॅलेडमध्ये प्रामुख्याने काकडीचा समावेश केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काकडीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट आढळतात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. तसेच वजन कमी करण्यासाठी, शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काकडीचा आहारात समावेश केला जातो. असे अनेक फायदे असणारी काकडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते असे मानले जाते. काकडी यासाठी कशी फायदेशीर ठरते जाणून घ्या.

आणखी वाचा : मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात करावा ‘या’ गोष्टींचा समावेश; Blood Sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी होईल मदत

उच्च कोलेस्ट्रॉलसाठी काकडी अशी ठरते फायदेशीर :

  • ‘मेडिकल न्यूज टुडे’मध्ये दिलेल्या माहितीनुसार काकडी खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन, शरीरासाठी फायदेशीर असणारा कोलेस्ट्रॉल वाढतो.
  • तेलकट आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. यावर उपाय म्हणजे काकडी खाल्ल्यने शरीरासाठी फायदेशीर असणारा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळते.
  • कोलेस्ट्रॉल वाढल्यास लठ्ठपणा आणि मधुमेह अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. यासाठी काकडी खाणे फायदेशीर ठरू शकते.
  • ‘हेल्थ लाईन’ या आरोग्याविषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटनुसार काकडीमध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, त्यामुळे दैनंदिन आहारात याचा समावेश करावा.
  • काकडी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याबरोबर फॅट बर्न करण्यासह मदत करते. यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does eating cucumber helps to reduce cholesterol know more pns