Hair Care: केसांची काळजी घेणे खूप कठीण असते. विशेषत: ऋतूतील बदलांमुळे केसांसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. सध्या पावसाळा जोमात सुरू आहे, यावेळी वातावरणात आर्द्रता वाढल्याने केसांच्या समस्याही वाढतात. या काळात तुमचे केस कोरडे, निर्जीव होऊ शकतात आणि केस गळणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात केस चिकट होतात आणि त्यामुळे त्यातून दुर्गंधी येऊ लागते. पावसाळ्यात केसांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय ट्राय करू शकता. याने तुमच्या केसांच्या असलेल्या समस्या निघून जातील. तसंच तुमचा केसांमधील येणारा वास देखील निघुन जाईल.

केसांना वास का येतो?

यामागे अनेक कारणे असू शकतात. पावसाळ्यातील वातावरणातील बदलामुळे सहसा असं होऊ शकत. किंवा हे कॅप परिधान केल्यामुळे सुदधा केसांना दुर्गंधी येऊ शकते. तसंच तुम्ही जर कांदे, लसूण, कढीपत्ता आणि जिरे यांसारख्या उग्र वासाच्या पदार्थ खात असाल, तर त्यामध्ये असलेल्या तेलामुळे देखील केसांना वास येऊ शकतो. याशिवाय, आजूबाजूला असलेल्या प्रदूषणामुळे टाळूमध्ये दुर्गंधी येऊ शकते कारण जेव्हा वातावरणातील प्रदूषक तुमच्या टाळूवर जमा होतात तेव्हा त्यामुळे तुमच्या केसांना दुर्गंधी येऊ शकते.

( हे ही वाचा: Hair Care: केसांना चमकदार बनविण्यासाठी ‘या’ हेअर मास्कचा वापर करा; जाणून घ्या कसे बनवायचे)

केसांच्या दुर्गंधीपासून सुटका कशी करावी?

१) शिकेकाई शैम्पू

बाजारात उपलब्ध असलेले शैम्पू हे केमिकल-आधारित असतात जे तुमच्या टाळू आणि केसांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. हे टाळण्यासाठी, आपण नैसर्गिक पद्धत वापरावी. शिककाई यासाठी चांगली सिद्ध होऊ शकते. ही तुमची टाळू स्वच्छ ठेवण्याची काळजी घेते आणि त्यातील अँटी-फंगल गुणधर्म कोंडापासून मुक्त होण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ते आपल्या टाळूची पीएच पातळी राखण्यास मदत करते आणि केसांमध्ये होणारी जळजळ कमी करते. हे करण्यासाठी शिककाई, रेठा, आवळा, कढीपत्ता आणि हिबिस्कसची फुले एका भांड्यात रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसर्‍या दिवशी सर्व साहित्य पाण्यात उकळवा आणि नंतर साहित्य बारीक करा. आता, ते शैम्पू म्हणून वापरा, लावताना तुमच्या टाळूवर आणि केसांच्या लांबीवर लावा. केस धुण्यापूर्वी केसांना ३ ते ४ मिनिटे मसाज करा.

२) टी ट्री ऑयल

टी ट्री ऑयल तेलाचा वापर टाळूचा दुर्गंध कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो कारण त्यात स्ट्रॉन्ग क्लिनिंग, एंटी बाक्टीरियल आणि एंटी माइक्रोबियल गुण असतात, जे केसांमधील दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. या तेलामुळे टाळूमध्ये रक्त प्रवाह देखील सुधारू शकते. तसंच टी ट्री ऑयल तुम्हाला डोक्यातील कोंडा आणि टाळूच्या संसर्गापासून मुक्त होण्यास देखील मदत करतो. ज्यामुळे तुमच्या केसांची हेल्थ चांगली राहते.

( हे ही वाचा: Hair Care: केसांची काळजी घेण्यासाठी स्कॅल्प फेशियल करा; जाणून घ्या ते कसे करावे)

३) लिंबाचा रस

एक नैसर्गिक आणि सोपा घरगुती उपाय म्हणजे लिंबाचा रस वापरणे. लिंबाच्या रसामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे टाळूवर लपलेले काही दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी होऊ शकतात. लिंबाचा रस आम्लयुक्त असल्यामुळे टाळूचा पीएच संतुलित ठेवण्यास, टाळू आणि केसांची दुर्गंधी कमी करण्यात मदत होते. शिवाय, लिंबू व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्सने भरलेले आहे जे केसांच्या कूपांना बळकट करून, कोंडा-उद्भवणाऱ्या बुरशीचा सामना करून, टाळूच्या संसर्गाशी लढा देऊन केस मजबूत करण्यास मदत करू शकतात.