यंदाच्या होळीच्या सणाला तुम्ही देखील तुमच्या मित्रपरिवारासह खूप मजा केली असेल. मात्र आजकाल रंग आणि गुलालामध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिसळलेले असतात. या केमिकलमुळे आपल्या त्वचेला मात्र याची मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी, जळजळ, खाज आदी समस्या निर्माण होतात. काही लोकांची त्वचा खूप निस्तेज होते आणि त्वचेवरील चमक नाहीशी होते. होळीनंतर तुमच्यासोबत अशी कोणतीही समस्या उद्भवली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

रंगांमुळे त्वचेला होणार त्रास कमी करण्याचे घरगुती उपाय :

तूप किंवा खोबरेल तेल :

जर तुमच्या चेहऱ्यावर रंगांमुळे अ‍ॅलर्जी झाली असेल तर ती अ‍ॅलर्जी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर तूप किंवा खोबरेल तेल लावू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. तसेच, खाज येणे, पुरळ येणे इत्यादी समस्यांमध्ये आराम मिळेल आणि तुमच्या चेहऱ्याची चमकही परत येईल.

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

सतत चष्मा वापरून तुमच्याही डोळ्याजवळ व्रण आले आहेत का? या सोप्या टिप्स वापरून घालवा डाग

कडुलिंबाची पाने :

तुमच्या चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी किंवा पुरळ बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप उपयुक्त ठरू शकतात. ही पाने बारीक करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि चेहरा सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

दही आणि बेसन :

होळी खेळल्यानंतर चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले असेल तर तुम्ही दही आणि बेसनाचा फेस पॅक लावू शकता. हा फेसपॅक चेहऱ्याला लावून काही वेळ मसाज करा. त्यानंतर चेहरा धुवा. हा पॅक पुन्हा लावा आणि कोरडा होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा तजेलदार होईल आणि चेहऱ्याची हरवलेली चमक पुन्हा परत येईल.

उन्हाळ्यात मसाला चहा पिणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक; ‘या’ समस्यांचा करावा लागेल सामना

मसूरची डाळ :

चेहऱ्याची चमक परत आणण्यासाठी मसूरच्या डाळीचा वापर करून तयार केलेला पॅकही खूप उपयुक्त आहे. यासाठी लाल मसूर काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. यानंतर मसूर बारीक करून त्यात थोडे दूध आणि मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा होऊ द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

कोरफडचा गर :

कोरफडचा गर चेहऱ्यावरील तेज परत आणण्यासोबतच स्किन अ‍ॅलर्जी दूर करण्याचे काम करते. त्यामुळे रंगांमुळे त्वचेला त्रास होत असेल तर कोरफडचा गर त्वचेवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर त्वचा पाण्याने चेहरा धुवा. शक्य असल्यास दिवसातून किमान दोनदा हे करा. त्यामुळे बराच दिलासा मिळेल.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)