आयुर्वेदानुसार, कांद्याच्या रसामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात, जे तुमच्या केसांना खोल पोषण देण्यास मदत करतात. केसांची वाढ, केस गळणे, कोंडा, केस तुटणे आणि केसांशी संबंधित इतर समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रस वापरला जातो. अलीकडच्या काळात, अनेक सेलिब्रिटींनी दावा केला आहे की कांद्याचा रस केस गळती थांबवण्यासह केस वाढीस देखील मदत करतो. दाव्यानुसार, कांद्यामध्ये जास्त प्रमाणात असलेले सल्फर केसांसाठी फायदेशीर आहे.
त्वचाविज्ञानी डॉ. आंचल पंथ यांच्या मते, कांद्याचे अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना डॉ पंथ यांनी स्पष्ट केले की, “उपलब्ध घटकांच्या वापरामुळे कोणताही घरगुती उपाय सहजपणे लोकप्रिय झाला आहे.”
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, सल्लागार त्वचाविज्ञानी डॉ मानसी शिरोलीकर म्हणाल्या, “केस हे केराटिन पासून (एक प्रथिने) बनलेले असतात ज्यात सल्फर असते. कांद्याच्या रसातही सल्फर मुबलक प्रमाणात असते. केस आणि टाळू एकमेकांत गुंफलेले असल्याने, कांद्याचा रस केस मजबूत आणि दाट करण्यासाठी अतिरिक्त सल्फर देऊ शकतात. त्यामुळे केस गळणे थांबते आणि केसांच्या वाढीस चालना मिळते.
( हे ही वाचा: हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल? फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)
केसांच्या वाढीसाठी कांद्याच्या रसावर फारसे संशोधन झालेले नाही असे डॉ. मानसी यांनी सांगितले आहे. एका छोट्याशा अभ्यासानुसार दिवसातून दोनदा कांद्याचा रस टाळूला लावल्याने काही लोकांना केस वाढण्यास मदत होऊ शकते. सुमारे ७४% सहभागींचे ४ आठवड्यांनंतर केस पुन्हा वाढले आणि सुमारे ८७% लोकांना ६ आठवड्यांनंतर केस पुन्हा वाढण्याचा अनुभव आला.
कांद्याचा रस केसांना लावल्याने काही फायदा होतो का?
डॉक्टर पंथ यांच्या कांद्याच्या अर्कामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. निरोगी टाळूमध्ये मजबूत केसांचे कूप (capillus) असतात. कांदा रक्ताभिसरण वाढवू शकतो. कांद्याचा रस केसांना आणि टाळूला लावल्याने केसांच्या रोमांना रक्तपुरवठा वाढतो.
( हे ही वाचा: युरिक ॲसिड वाढल्यास होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; यापासून सुटका कशी मिळवायची जाणून घ्या)
केसांमध्ये कांद्याचा रसाचा वापर करावा का?
डॉक्टर पंथ यांच्या मते, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय याचा वापर करू नये. ते म्हणाले, “दुर्दैवाने, मी असे अनेक रुग्ण पाहिले आहेत ज्यांना डोक्यावर कांद्याचा रस लावल्यानंतर टाळूवर खाज येण्यापासून ते त्वचारोग, गंभीर केस गळणे यासारख्या प्रतिकूल प्रतिक्रिया होत्या,”. मानसी म्हणाल्या, “कांद्याच्या रसामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, कांद्याचा रस त्वचेवर लावल्यानंतर ऍलर्जी असलेल्या लोकांमध्ये अनेक लक्षणे उद्भवू शकतात. म्हणूनच तुम्हाला ऍलर्जी आहे की नाही हे पाहण्यासाठी रस लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.