Peeing After Sex: आपल्याकडे आज कितीही प्रगत तंत्रज्ञान असले, कितीही नवनवीन फॅशन, उच्च जीवनशैलीचे अनुसरण केले जात असले, अजूनही आपल्या समाजात अशा कित्येक गोष्टी आहे कि, ज्यावर उघडपणे चर्चा होत नाही. गर्भधारणा आणि लैंगिक संबध हे अशाच विषयांपैकी एक मुद्दा आहे. याबाबत फारशी चर्चा होत नसल्याने लोकांमध्ये त्याबाबत अनेक समज गैरसमज निर्माण होतात. विशेषत: विवाहित जोडपे जेव्हा बाळासाठी गर्भधारणेचा प्रयत्न करतात तेव्हा लैंगिक संबध ठेवताना, किंवा लैंगिक संबध ठेवल्यानंतर कोणत्या गोष्टी पाळव्या आणि कोणत्या टाळाव्या याबाबत त्यांना काहीच माहिती नसते.
गर्भधारणा आणि लैंगिक संबधाबाबतच्या अशाच एका मुद्द्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच विवाहित जोडप्यांना असा प्रश्न पडतो की, गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना लैंगिक संबधानंतर जर स्त्रियांनी लगेच लघवीला जावे की नाही. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता तर कमी होणार नाही ना? अशी भिती त्यांच्या मनात असते. याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार, याबाबत ऐकिवात आलेल्या गोष्टींचे अनुसरण करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशी एक धारणा आहे की, जर एखाद्या स्त्रीने लैंगिक संबंधानंतर लघवी केली तर गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते कारण असा समज आहे की, मुत्राद्वारे वीर्य बाहेर टाकले जाते. पण हे खरे आहे का?
बंगळुरूतील हेब्बल येथील मणिपाल हॉस्पिटलमधील (प्रसूती आणि स्त्रीरोग) सल्लागार डॉ. विजया शेरबेट यांच्यानुसार, वीर्यमध्ये शुक्राणू असतात, जे उघड्या डोळ्यांना न दिसणार्या लहान पेशी असतात. डॉ. शर्बत सांगतात, “स्त्रियांच्या शरीरामध्ये तयार झालेले फेरोमोन्स शुक्राणू पेशींना आकर्षित करतात, जे एकदा जमा झाल्यावर स्वतंत्रपणे फिरतात. संभोगानंतर स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणारा पांढरा स्त्राव हे शुक्राणूंचे वाहक असतात. लैंगिक संबधानंतर लघवी करणे किंवा मुत्राशयाची जागा साफ करणे गर्भधारणा रोखत नाही.
मुंबईतील आयव्हीएफ फर्टीलिटीमध्ये प्रजनन क्षमता सल्लागार असलेल्या डॉ. सेन्हा साठे सांगतात की, लैंगिक संबधानंतर लघवी केल्यामुळे गर्भधारणेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत असल्याचा अद्याप कोणतेही पुरावे समोर आलेले नाही. लैंगिक संबधानंतर लघवी करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. पण, कसे ? हेच जाणून घेण्यासाठी, शरीरशास्त्राबाबत एक धावता आढावा घेऊ या.
डॉ साठे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, ”स्त्रियांचा मुत्रमार्ग फक्त १.५ से.मी. लांबीचा असतो आणि योनी आणि गुद्द्वाराच्या मध्यभागी मुत्रमार्गाचे द्वार (meatus) असते. त्यामुळे लैंगिक क्रिया करताना हानिकारक जीवाणू तुमच्या मुत्रमार्गामध्ये प्रवेश करु शकतात, ज्यामुळे तुम्हाला युटीआय म्हणजे संसर्ग होऊ शकतो. लैंगिक संबधानंतर लघवी केल्याने मुत्रमार्गातील कोणताही हानिकाराक जीवाणू बाहेर पडण्यास किंवा साफ करण्यास मदत होते, ज्यामुळे मुत्रमार्गाचा संसर्ग टाळण्यास मदत होते.
गर्भधारणेचा प्रयत्न करताना लैंगिक संबधानंतर लघवी करु शकतो का?
पण तरीसुद्धा तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असल्यास लैंगिक संबधानंतर लघवी करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर डॉ. साठे सांगतात की, हो, ही अगदी सामान्य गोष्ट आहे. लैंगिक संबघानंतर लघवी केल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होत नाही.
डॉ. साठे पुढे स्पष्ट करतात की, मूत्रमार्ग आणि योनी हे जरी एकमेकांच्या अगदी जवळ असले तरी ते वेगळे अवयव आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. “मूत्रमार्ग शरीराबाहेर मूत्र वाहून नेण्यासाठी जबाबदार आहे, तर योनीमार्ग आहे लैंगिक संबधाच्यावेळी वीर्य बाहेर टाकण्याचे काम करते. तुम्हाला लक्षात येईल की संभोगानंतर लघवी करण्यासाठी तुम्ही उभे राहिल्यावर काही पांढरा स्र्त्राव बाहेर पडू शकतो. हे सामान्य आहे. जरी काही (शुक्राणू असलेले) वीर्य योनीतून बाहेर पडत असले, तरीही अंड्याला फलित करण्यासाठी पुरेसे शिल्लक असते,” .
हे ही वाचा<< किडनी बिघडताना शरीर ओरडून देतं असतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखून मूत्रपिंड निकामी होणे टाळा
तर यातून हे स्पष्ट होते ही, लैंगिक संबधानंतर लघवी केल्याने तुमच्या गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम होत नाही. पण ही सवय लैंगिक संबधानंतर सर्वाधिक धोका असणाऱ्या युटीआय विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काम करू शकते.